

MPSC Student Protest: पुणे तसेच कोल्हापूरमध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांनी आज आयोगातील भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवत मोर्चा काढला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार देखील उपस्थित होते. रोहित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन लढत आहेत.
दरम्यान, आज आंदोलन सुरू असताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी रोहित पवार हे स्वतःचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी आंदोलन करत आहेत असा आरोप केला. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं देखील म्हणाले.
नवनाथ बन माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'स्वतःचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी रोहित पवार आंदोनल करत आहेत. टीईटी पेपर फुटी, म्हाडा मधील पेपर फुटी तेव्हा रोहित पवार सुप्रिया सुळे, नाना पटोले मुग गिळून का बसले होते. हे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन नाही राजकीय करिअरसाठी आंदोलन सुरू आहे.
नवनाथ बन आयोगाच्या प्रमुखांच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले की, 'रोहित पवार यांना माहिती नाही का की एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणात जे दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई केली गेली. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचे नेते होऊ असं रोहित पवार यांना वाटतं. सर्वसामान्य विद्यार्थ्यांची काळजी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेत.
नवनाथ बन यांनी या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी संजय राऊत रात्रभर जुलूस निघतो त्याचे समर्थन करता. लालबागमध्ये आलेल्या मिरवणुकीवर अंडी फेकली जातात तेव्हा तुम्ही मुग गिळून बसता. बकर ईदच्या दिवशी लाखो बकरी कापल्या जातात तेव्हा इकोफ्रेंडली बकरी ईद साजरी करा असं सांगता का? आम्ही आमची परंपरा पाळत आहोत.