Navnath Ban on Thackeray Rally: आदित्य-अमित यांचे राजकीय करिअर घडवण्यासाठी आंदोलनाचा वापर; नवनाथ बन यांचा हल्लाबोल

ठाकरे बंधूंच्या या संयुक्त सभेवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सडकून टीका केली आहे.
Navnath Ban on Thackeray Rally
Navnath Ban on Thackeray RallyPudhari
Published on
Updated on

मुंबई: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून 'जेन-झी'च्या नावाखाली आंदोलन हायजॅक केले जात आहे. नीट परीक्षा, सर्वसामान्य विद्यार्थी आणि तरुणांच्या करिअरशी या दोन्ही पक्षांना आणि त्यांच्या आंदोलनाला काहीही देणे-घेणे नसल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवारी केली.

पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने रविवारी तिरंगा विजय जल्लोष केला.

Navnath Ban on Thackeray Rally
Gen Z Shivaji Park Political Rally: शिवाजी पार्कवर ‘इन्स्टा’ जनरेशनचा राजकीय कल्ला

ठाकरे बंधूंच्या या संयुक्त सभेवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या या सभेत कोणताही राजकीय झेंडा नसल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांचा अजेंडा पक्का आहे.

या मोर्चात कोणत्याही पक्षाचा अधिकृत झेंडा दिसत नसला, तरी संजय राऊत तुमचा राजकीय अजेंडा आधीपासूनच ठरलेला आहे. या आंदोलनाचा सर्वसामान्य 'जेन-झी' तरुण, नीट परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी किंवा त्यांच्या भवितव्याशी काहीही देणे-घेणे नाही.

Navnath Ban on Thackeray Rally
Mumbai Tiranga Rally: दिवंगत विद्यार्थ्यांचे राज ठाकरेंकडून स्मरण

तुम्हाला फक्त आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे राजकीय करिअर सेट करायचे आहे, असा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे. तसेच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना या जल्लोष रॅलीत भाषण करण्याची संधी न मिळाल्यावरून नवनाथ बन यांनी उपरोधिक टोला लगावला.

संजय राऊत, जर या आंदोलनात कोणताही छुपा राजकीय अजेंडा नव्हता, तर मग तुम्हाला या रॅलीत भाषण का करू दिले गेले नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच, तुम्ही या मंचावर बोलला असतात तर तिथेही तुम्ही राहुल गांधींचा उदोउदो केला असता, त्यांचे कौतुक केले असते आणि या आंदोलनाचे सर्व श्रेय राहुल गांधींच्या पदरात पाडले असते. म्हणूनच ठाकरे बंधूंनी तुम्हाला या आंदोलनात बोलू दिले नाही, असा दावा नवनाथ बन यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news