Navi Mumbai Pollution Construction: नवी मुंबईत बांधकामांचा धूर वाढला; १८ विकासकांची कामे बंद

प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन; ८७ बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची माहिती
Mumbai Construction Pollution
Mumbai Construction PollutionPudhari
Published on
Updated on

मुंबई : विविध पायाभूत प्रकल्प तसेच निवासी व व्यावसायिक बांधकामामुळे नवी मुंबईत प्रदूषणात वाढ झाल्याची कबूली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेने पारित केलेल्या प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीची पुर्तता न केल्याबद्दल 87 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहेत. तर या कार्यप्रणालीची पूर्तता होईपर्यंत 18 विकासकांची कामे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही मंत्री मुंडे यांनी दिली आहे.

Mumbai Construction Pollution
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे मोठे विधान, म्हणाल्या...

नवी मुंबई शहरातील वाढत्या बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री पंकजा मुंडे यांनी माहिती दिली आहे. नवी मुंबईमध्ये गामी, डेल्टा, मेट्रो, कामधेनू, ट्रायसिटी, आकार, अक्षय आदी बांधकाम विकासकांकडून मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांदरम्यान धूळप्रदूषण, बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, तसेच माती व मलब्याच्या वाहतुकीमुळे

Mumbai Construction Pollution
Mumbai Sanitation Workers Protest: महापालिकेतील सफाई कामगार सोमवारी वर्षा बंगल्यावर धडकणार

रस्त्यांवर धूळ वाढत असल्याच्या आणि पर्यावरणीय नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या, असे मुंडे यांनी सांगितले. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 10 बांधकाम प्रकल्पांना संमतीपत्रातील नियमांचे पालन न केल्याबद्दल प्रस्तावित निर्देश दिले आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने प्रदूषण नियंत्रण मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 87 बांधकाम धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय नियमांचे पालन न करणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण 1 कोटी 56 लाख 99 हजार 679 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Mumbai Construction Pollution
Satara ZP Election: साताऱ्यातील राड्याने महायुतीत बेबनाव वाढणार?

प्रशासनाने मानक कार्यप्रणाली पूर्ण होईपर्यंत 18 विकासकांची कामे तात्पुरती बंद ठेवण्याचे निर्देशही दिल्याचे सांगत प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news