Mumbai Sanitation Workers Protest: महापालिकेतील सफाई कामगार सोमवारी वर्षा बंगल्यावर धडकणार

मालकी हक्काच्या घरांसाठी आंदोलन; जीर्ण वसाहतींच्या पुनर्बांधणीची मागणी तीव्र
Hereditary Jobs Safai Workers
Hereditary Jobs Safai WorkersPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी सोमवारी, 23 मार्च रोजी असंख्य सफाई कामगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी धडकणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियने दिली.

Hereditary Jobs Safai Workers
Satara ZP Election: साताऱ्यातील राड्याने महायुतीत बेबनाव वाढणार?

आशिया खंडात सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात रस्ते, ब्रीज, रुग्णालये आदिसाठी निधीची तरतूद केलेली आहे. परंतु सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी कोणतीही निधीची तरतूद केलेली नाही. महानगरपालिकेच्या 46 वसाहती सदर वसाहतीमधील सदनिका धोकादायक झाल्या आहेत. देखभाल न केल्याने 46 वसाहतीपैकी 36 वसाहती जीर्ण झालेल्या अवस्थेत आहेत. त्या कधीही कोसळू शकतील, अशी परिस्थिती आहे.

Hereditary Jobs Safai Workers
Property Rights Mumbai: अनेक वर्षे बेघर राहिलेल्या विधवा वृद्धेचा लढा यशस्वी

महापालिकेने सदर वसाहतीसाठी विशेष निधी मंजुर करून तिची पुर्नबांधणी करण्याची मागणी युनियनकडून करण्यात आली. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत, म्हणून सर्व चौक्यावर, प्रत्येक वसाहतीमध्ये सभा व प्रचार करण्यात आला आहे. यांची सुरुवात 10 मार्च रोजी शिशमहल वसाहतीपासून करण्यात आली आहे.

Hereditary Jobs Safai Workers
Navi Mumbai Super Speciality Hospital: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावावरून वाद; महासभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा फिरवली

याकरिता दरदिवशी प्रत्येक वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळी सभा घेवून मालकी हक्काच्या घरांसाठी समस्त कामगारांच्या कुटुंबांसह 23 मार्च 2026 रोजी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव आणि सरचिटणीस वामन कविस्कर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news