Dadar Railway New Platform: दादर स्थानकावर नवा प्लॅटफॉर्म; पिक अवरमध्ये अधिक लोकल धावण्यासाठी मार्गिकेचा विस्तार

पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तार प्रकल्पाचाच हा एक भाग असेल.
Dadar Railway New Platform
Dadar Railway New PlatformPudhari
Published on
Updated on

मुंबई: विक्रमी वर्दळीच्या दादर स्थानकावरील भार हलका व्हावा म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वे कॉरिडॉरला जोडणारा नवा प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तार प्रकल्पाचाच हा एक भाग असेल.

पिक अवरमध्ये अधिकाधिक लोकल गाड्या धावणे शक्य व्हावे म्हणून हा मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पश्चिम बाजूने भूसंपादन कधीच सुरू झाले आहे. खासकरून दळवी नगर भागातील 46 अतिक्रमणे त्यासाठी निश्चित केली असून तेथील बहुतांश रहिवाशांना जागा रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Dadar Railway New Platform
MMRDA Tender: एमएमआरडीए निविदेत अनियमितता; आ. परब यांचा आरोप

यातील काही अतिक्रमणे हटवण्याचे प्रयत्न कायदेशीर कचाट्यात अडकले आहेत. बहुतांश अतिक्रमणांचा प्रश्न पुनर्वसन प्रकल्पातून मार्गी लावला जाईल असे दिसते. त्यातून अनेक अतिक्रमीत बांधकामे पाडली गेली आहेत.

दादर स्थानकावर नवा प्लॅटफॉर्म बांधला गेला तर पश्चिम आणि मध्य रेल्वेदरम्यान उपनगरी गाड्या वेगवेगळ्या करण्याचे व्यवस्थापन सुधारेल. यामुळे लोकल गाड्यांची कोंडी करणारी ठिकाणे कमी होऊन लोकल गाड्यांचे वेळापत्रकही सुधारेल.

Dadar Railway New Platform
Education Policy: चार वर्षे पदवी अभ्यासक्रमाबाबत अडचणींचा डोंगर; महाविद्यालय स्तरावरील प्रश्न लक्षात घेण्याचा राज्यातून सूर

पिक अव्हरमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. दादरच्या नव्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने या स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मचे नंबरही बदलतील आणि प्रवाशांना इच्छित प्लॅटफॉर्मवर जाणे किंवा आपली गाडी सहज गाठणे शक्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news