Navi Mumbai rain update : नवी मुंबईसह उरण,पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले

बेलापूरला बाल्कनीचा स्लॅब कोसळला; वाशीत झाड कोसळून वाहनाचे नुकसान
Navi Mumbai rain update : नवी मुंबईसह उरण,पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले
Published on
Updated on

नवी मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Navi Mumbai rain update : नवी मुंबईसह उरण,पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले
Monsoon Update | गगनबावड्यात मुसळधार; ८ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

नवी मुंबईतील वाशी सेक्टर-15 मध्ये जोरदार वारा आणि खराब हवामानात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर अचानक झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही दिलासादायक बाब आहे की घटनेच्या वेळी गाडीत कोणीही नव्हते,त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. माहिती मिळताच संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाड हटविण्याचे काम सुरू केले. सतत पडणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे नवी मुंबईत झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांनी सावध राहून मोठ्या झाडाखाली वाहने उभी करू नयेत,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Navi Mumbai rain update : नवी मुंबईसह उरण,पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले
Mumbai rain : मुंबईत पावसाचा जोर कायम: रेल्वे वाहतूक विस्कळीत, सखल भागात पाणी साचले

रस्त्यावरच झाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-1 मधील शिवाजी महाराज चौकाजवळ एक मोठे झाड रस्त्यावर पडल्याने रस्ता पूर्णपणे ठप्प झाला. झाडे उन्मळून पडल्याने दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक प्रभावित होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाडे हटविण्याचे काम सुरू केले.खराब हवामानात नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Navi Mumbai rain update : नवी मुंबईसह उरण,पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले
Mumbai Rain Video: मुंबईत महापुरासारखी परिस्थिती! रस्ते जलमय; घरांमध्ये पाणी, दुकानं बंद, नागरिकांचे हाल

उरणमधील न्हावा शेवा पोलीस ठाण्यात शिरले पावसाचे पाणी घुसले. उरण शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे न्हावा शेवा पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरल्याने पोलीसांना कार्यालयीन कामकाज सोडून कार्यालयातून पाणी बाहेर काढण्याचे काम करावे लागले. उरण शहरात जोरदार पाऊस झाल्याने उरण मधील भेंडखळ,म्हातवली गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने रहिवाशांची एकच तारांबळ उडाली आहे. उरणमधील ग्रामीण भागात पावसाचा जोर असल्याने अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काल शनिवारी 4 जुलै रोजी रात्री ८.१० वाजण्यासुमारास बेलापूर शहाबाज गाव सेक्टर 19 अविघ्न को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 1123 A/- 1125 या बिल्डिंग मधील पहिल्या माळ्यावरचा बाल्कनीचा स्लॅब पूर्णपणे खाली पडला होता.  

Navi Mumbai rain update : नवी मुंबईसह उरण,पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले
Amba river overflowing Raigad : पावसाचा जोर कायम; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलाडली, नागोठणे शहारात पुराचे पाणी

नमुंमपा अग्निशमन विभागाने त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचत बिल्डिंग मधील 17 फ्लॅट मधील लोकांना सुरक्षित बाहेर काढले. पाच माळ्याची बिल्डिंग होती. एमएसईबीने घटनास्थळी येऊन पूर्ण बिल्डिंग मधील विद्युत पुरवठा बंद केला आहे. येथील काही रहिवाशांना महापालिके मार्फत परिवहन बस मधून वारकरी भवन येथे हलविण्यात आले.तर काही लोक आपल्या नातेवाईकांकडे गेले. बिल्डिंगच्या आत प्रवेश करु नये यासाठी दोन्ही गेटला लॉक केलेला आहे. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

24 तासातील पावसाची आकडेवारी

बेलापूर 302.78 मिमी

नेरुळ 152.00 मिमी

वाशी 141.80 मिमी

कोपरखैरणे 199.20 मिमी

ऐरोली 247.60 मिमी

दिघा 221.20 मिमी

सरासरी 210.76 मिमी

एकूण पाऊस 1 जून ते 5 जुलैपर्यंत 1020.22 मिमी

Navi Mumbai rain update : नवी मुंबईसह उरण,पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले
Raigad rainfall | उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना दिलासा; ढगांच्या गडगडाटासह पावसाची दमदार सुरुवात.

मोरबे धरण क्षेत्र

आजचा पाऊस 270.2 मिमी

एकूण पाऊस 1 जून ते 5 जुलैपर्यंत 871.4 मिमी

पातळी 72.15 मीटर (33.96%)

पावसामध्येच घडलेल्या घटना

आगीची घटना : 1

झाडे पडली : 25

स्लॅब कोसळले : 1

फांदी पडणे : 1

पाणी साचले : 11

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news