Mumbai rain : मुंबईत पावसाचा जोर कायम: रेल्वे वाहतूक विस्कळीत, सखल भागात पाणी साचले

Mumbai railway traffic disrupted : संततधार पावसामुळे लोकलची गती देखील मंदावली आहे
Mumbai rain : मुंबईत पावसाचा जोर कायम: रेल्वे वाहतूक विस्कळीत, सखल भागात पाणी साचले
Published on
Updated on

Mumbai heavy rain local train services disrupted

मुंबई : शहरात संततधार पाऊस सुरू असून, अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दादर हिंदमाता परिसर, सायन किंग सर्कल, वडाला सिग्नल चौक आणि आजूबाजूच्या परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत.

रात्रीपासून सुरू असलेला मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकलची गती मंदावली आहे. मुंबईत १३५ ठिकाणी झाडे, फांद्या पडणे तसेच घरे, भिंती कोसळ्याच्या शहरात नऊ घटनांचे प्रकार घडले आहेत.

Mumbai rain : मुंबईत पावसाचा जोर कायम: रेल्वे वाहतूक विस्कळीत, सखल भागात पाणी साचले
Pune Monsoon Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी; अनेक भागांत पाणी साचले, नागरिकांना दिलासा

आतापर्यंत मुंबई शहरात १३४ मिमी, पूर्व उपनगरात १६४ मिमी आणि पश्चिम उपनगरात १४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुलुंड, एस वॉर्ड, पवई, मानखुर्द फायर स्टेशन याठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. नवी मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने पानी जमा झाले आहे. मुंबई मध्ये हिंदमाता किंग सर्कल सह सखल भागात पाणी साचले आहे. परिणामी पश्चिम लोकल मार्गावर अप आणि डाऊन दिशेने १० मिनिट उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे मार्गावर १० ते १५ मिनिट उशिरा लोकल धावत आहे. तसेच हार्बर मार्गावरील लोकल ५ ते ७ मिनिट उशिराने धावत आहेत.

Mumbai rain : मुंबईत पावसाचा जोर कायम: रेल्वे वाहतूक विस्कळीत, सखल भागात पाणी साचले
Kolhapur rain | रिमझिमल्या जलधारा..! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’

पावसाची नोंद

  • मंबई शहर 134 मिमी

  • मुंबई पूर्व उपनगरे १६४ मिमी

  • मुंबई पश्चिम उपनगरे १४९ मिमी

मुंबईत मुसळधार, किती कुठे पाऊस?

  • सांताक्रूझ 165.9

  • जुहू विमानतळ 164.5

  • विक्रोळी 163.0

  • राम मंदिर स्टेशन 157.0

  • बांद्रा 141.5

  • विद्याविहार 132.0

  • सायन 115.0

  • चेंबूर 99.5

  • कुलाबा 99.0

  • भायखळा 97.5

Mumbai rain : मुंबईत पावसाचा जोर कायम: रेल्वे वाहतूक विस्कळीत, सखल भागात पाणी साचले
Sambhajinagar Rain : मुसळधार पावसाचा कहर : साताऱ्यात पूल वाहून गेला; अनेक नाल्यांना पूर, ५० हून अधिक घरांत शिरले पाणी

पुढील ४ दिवस मुसळधारेचा इशारा

मुंबईला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात देखील चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे मुंबईवर ओढवलेलं पाणीसंकट कमी होण्यास मदत होणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news