Kalyan Crime News: कल्याणमध्ये पूजापाठाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 78 वर्षीय भोंदूबाबाला बेड्या

खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या 78 वर्षीय भोंदूबाबाला बेड्या
Jail
Jailfile photo
Published on
Updated on

डोंबिवली: सद्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यापाठोपाठ अनेक भोंदूबाबांच्या कहाण्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. अशातच कल्याणातही तळपायाची आग मस्तकात जाणारा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

पूजा/पाठ करून घरातील बाधा दूर करण्याच्या बहाण्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 78 वर्षीय भोंदू बाबाला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Jail
Gorai medical crisis: सुविधांअभावी गोराईमध्ये वैद्यकीय सेवा व्हेंटिलेटरवर; 100 वर्षीय दवाखान्यामध्ये एकही बेड उपलब्ध नाही

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी कल्याण पश्चिमेत आईसोबत राहते. या मुलीच्या आजी आणि वडिलांचा गेल्या दीड-दोन वर्षांत लागोपाठ मृत्यू झाला आहे. पिडीत मुलीची आई या भोंदू बाबाकडे गेली असता तुमच्या घरात बाधा असल्याचे सांगत भोंदू बाबाने घराची शांती पूजा करावी लागणार असल्याचा सल्ला दिला.

बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पिडीत मुलीच्या आईने त्याला घरी बोलावले. पूजा-पाठ करण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या या बाबाची वासनांध नजर मुलीवर पडली होती. हा बाबा संधीची वाट पाहत होता. एकेदिवशी मुलगी घरात एकटीच होती.

ही संधी साधून बाबा घरी आला. या मुलीवर अत्याचार करून बाबा पसार झाला. घरी परतलेल्या आईला मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून तिच्या आईला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ मुलीसह खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी या दोघी माय-लेकीला धीर दिला. त्यानंतर मात्र पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन आरोपी शाहिद शेख याला अटक केली. त्याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायदा, पोक्सो कायदा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jail
Mumbai drain cleaning scam: नालेसफाईवरून रणकंदन; कामचुकार कंत्राटदारांना गजाआड करू

विशेष म्हणजे पिडीत मुलीची आई घरात नसताना हा भोंदू बाबा दोन वेळा त्यांच्या घरी गेला आणि त्याने पिडीत मुलीवर अत्याचार केला. या संदर्भात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी वेगवेगळ्या अंगाने तपास सुरू केला आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून अधिक चौकशी सुरू आहे.

अंधश्रद्धेचा फायदा घेऊन होणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनीही नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही भोंदू बाबाच्या नादी लागू नका. संशयास्पद प्रकार दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा. आरोपी शाहिद शेख याने केलेल्या कृत्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे. बदमाश बाबाने यापूर्वी अशा पद्धतीने आणखी काही प्रकार केले आहेत का ? याचाही चौकस तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news