Navi Mumbai Crime News: अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या; नराधम २४ तासांत जेरबंद

तुर्भे पोलिसांची दहा विशेष पथकांमार्फत तपासमोहीम; घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी
Arrest
ArrestPudhari
Published on: 
Updated on: 

कोपरखैरणे: मित्राच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली. मात्र या संतापजनक घटनेने तुर्भेवासीय आक्रमक झाले असून त्यांनी तात्काळ आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

१० ऑक्टोबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.

मुलीला खाऊचे आमिष दाखवून खैरणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिरालगतच्या जंगलात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे.

Arrest
SEBI Celebrity Ad Rules: सेबीचा मोठा निर्णय! सेलिब्रिटी जाहिरातींसाठी नवे नियम; गुंतवणूकदारांसाठी काय बदलणार?

आरोपीच्या शोधासाठी दहा पथकांची नियुक्ती

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी दहा विशेष पथके तैनात केली होती. पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला.

Arrest
Kalbadevi Temple History: मुंबईच्या काळबादेवी मंदिराचा इतिहास माहिती आहे का? ३०० वर्षांपूर्वीची रंजक कहाणी

नराधमाचे नाव सांगण्याची पोलिसांची टाळाटाळ

एकीकडे घटनेचे गांभीर्य जाणून पोलीस अधिकाऱ्यांनी एका दिवसात आरोपीला अटक केली, दुसरीकडे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचे नाव गुपित ठेवण्यात धन्यता मानली. या प्रकरणी अनेकदा फोन केला, मात्र उपायुक्त यांनी फोन न उचलल्याने त्या नराधमाचे नाव उघड होऊ शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news