

Mumbai Airport Opening Adani Inspection
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर बुधवार रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटना आधी म्हणजे आज सोमवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची अदानींनी विशेष विमानाने येऊन पाहणी केली.
आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना मिळाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
अहमदाबादहून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी जेटने गेल्या आठवड्याच्या शनिवारी २० सप्टेंबर रोजी नवी मुंबई विमानतळावर उतरले. मुक्काम करून त्याच प्रवाशांना घेऊन दुसऱ्या दिवशी दुपारनंतर परत गेले होते. एकीकडे उद्घाटनाची तयारी होत असताना दुसरीकडे आणखी एक गुड न्यूज एअर इंडियाने आज मंगळवारी दिली. पहिली उड्डाणाची घोषणा करणारी विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्स पाठोपाठ आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडीयाने ही 2026 च्या मध्यापर्यंत दररोज 55 तर 2026 च्या हिवाळ्यापर्यंत दररोज 60 विमानांचे उड्डाण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असणार आहे.
इंडिगो नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण सुरु करणारी ठरणार पहिली विमान कंपनी. पहिल्या दिवसापासून १५ हून अधिक शहरांकडे दररोज १८ उड्डाणे करण्याचे इंडिगोचे उद्दिष्ट आहे. विमानतळ सुरु झाल्यानंतर रोज ७९ उड्डाण होतील. यापैकी १४ आंतराष्ट्रीय असतील. २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली चाचणी उड्डाण केले होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा टप्पा-१ आणि टप्पा २ साठी १९ हजार ६४७ कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्चापैकी १२ हजार ७७० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
सिडकोकडून १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये ५.५ मीटरपर्यंत भूविकास, उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण, ही विकासपूर्व कामे पूर्ण केली आहेत. दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमान सी-२९५ द्वारे उद्घाटन लँडिंग करण्यात आले आणि त्यानंतर एसयु ३० ने दोन लो पास केलेत. तसेच इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस ए ३२० ने २९ डिसेंबर २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले व्यावसायिक लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. दि.३० जून २०२५ पर्यंत या प्रकल्पाने एकूण ९६.५% भौतिक प्रगती साधलेली आहे.
सध्या जवळपास १३ हजार कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १ आणि २ टप्प्यामध्ये २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे, हे विमानतळ सप्टेंबर २०२५ मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाले आहेत.