

मुंबई : तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईमधील विशेषत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व स्थानक बाहेरील रस्ता, आझाद मैदान परिसरात रविवारी जागोजागी कचरा पडलेला दिसून येत होता. पावसामुळे काही कचरा कुजून दुर्गंधीही पसरली होती.
आंदोलक जेवणाचे प्लेट्स, पाण्याच्या बाटल्या कुठेही टाकत आहेत. अन्नही जागोजागी पडलेले आहे. फॅशन स्ट्रीटकडे जाणार्या मधल्या रस्त्यावर अन्न, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, जेवण्याच्या कागदी प्लेट्स पडलेल्या होत्या. दरम्यान, महापालिकेचे कर्मचारी सायंकाळी विविध ठिकाणी स्वच्छता करताना दिसत होते.