Navi Mumbai Landslide Risk: नवी मुंबईमध्ये २२ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका

यादी अधिकृतपणे प्रसिध्द नाही : नागरिकांमध्ये चिंता
Navi Mumbai Landslide Risk
Navi Mumbai Landslide RiskPudhari
Published on
Updated on

वाशी: पावसाळा तोंडावर असतानाही महापालिकेने दरडग्रस्त भागांची यादी जाहीर केलेली नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईत २२ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे.

नुकतीच काही दिवसांपूर्वी पावणे परिसरातील माती भरण्याच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मातीचा प्रचंड ढिगारा अचानक घसरुन शेजारील औद्योगिक कंपन्या आणि मुख्य रस्त्यावर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Navi Mumbai Landslide Risk
Mumbai Airport Bomb Threat: बॉम्बच्या धमकीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तणाव

सदरची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील दरडप्रवण भागांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई शहराच्या पूर्व दिशेला डोंगर रांगा आहेत. या ठिकाणी अगोदर दगडखाणी असल्याने डोंगर पुरते पोखरले गेले आहेत. त्यामुळे येथील अनेक डोंगर कमकुवत झाले आहेत.

नवी मुंबई शहरात पावसाळी दिवसात अनेक ठिकाणी माती खचणे, भिंती कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळी दिवसात दरडप्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची महापालिका आणि एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. तसेच त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांना दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात आणून देऊन त्यांचे तत्परतेने स्थलांतरण करावे, असे आयुक्तांनी २२ एप्रिल रोजी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सूचित केले होते.

Navi Mumbai Landslide Risk
Maharashtra Monsoon Delay: मान्सून लांबला, चिंता वाढली! मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात २० जूनपर्यंत ओढ देणार

दरड प्रवण क्षेत्राबाबत अधिकृत सूचना नाही

आता १५ जून उजाडला तरीही नवी मुंबई महापालिकेतर्फे अद्याप दरड प्रवण क्षेत्राबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. तसेच संभाव्य धोकादायक ठिकाणी इशारा फलकही लावलेला नाही. याबाबत महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातून माहिती घेतली असता फक्त विभागवार दरड प्रवण क्षेत्रांची त्यांनी माहिती दिली असून तशी यादी अद्याप प्रसिध्द केली नसल्याचे समजते. बेलापूर-३, नेरुळ-५, तुर्भे-९, घणसोली-२ आदी दरड प्रवण ठिकाणे आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news