BMC Election 2026: मुंबई काबीज करण्यासाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन'; या दिवशी मोदी - शहांच्या तोफा धडाडणार, सोबत भागवतही असणार

BMC Election 2026
BMC Election 2026pudhari photo
Published on
Updated on

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याची सत्ता मिळवल्यानंतर आता मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भव्य प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

BMC Election 2026
Sanjay Raut: 'ठाकरे बंधुंची युती झालेलीच आहे, फक्त जागावाटप...'; संजय राऊत काय म्हणाले?

प्रचाराचा बिगुल: मोदी-शहांच्या सभांच्या तारखा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजपचे हे दोन्ही सर्वोच्च नेते मुंबईत प्रचाराचा धडाका लावणार आहेत:

७ जानेवारी २०२६: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार असून, मुलुंडसह दोन महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा पार पडतील.

११ जानेवारी २०२६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भव्य जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१२ जानेवारी २०२६: सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील मुंबईत असणार असून, ते पदयात्रा किंवा जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे.

BMC Election 2026
Sandeep Deshpande: मुंबईसाठी त्याग करायला सगळेच तयार.... संदीप देशपांडेचे सुचक वक्तव्य

'युद्ध आणि निवडणुकीत सगळं माफ'

पुण्यातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. यावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी "युद्ध, प्रेम आणि निवडणुकीत सगळं माफ असतं" असे मिश्किल विधान करत, निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व काही फेअर असल्याचे सुचित केले आहे.

दरम्यान, मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मनसे विरूद्ध भाजप - शिवसेना शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत असेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे.

शिवसेना उबाठा गटासाठी तसेच मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. जर मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून निसटली तर तिथून त्यांना बाऊन्स बॅक करणं खूप जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीत आपला सगळा जोर लावण्याची शक्यता आहे.

BMC Election 2026
Sanjay Raut : ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करतील : संजय राऊत

निवडणुकीचे वेळापत्रक:

अर्ज भरण्यास सुरुवात: २३ डिसेंबर २०२५ (आजपासून)

मतदान: १५ जानेवारी २०२६

मतमोजणी: १६ जानेवारी २०२६

या हाय-व्हल्टेज प्रचार दौऱ्यांमुळे मुंबई महापालिकेची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि ऐतिहासिक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news