

महाराष्ट्राच्या जीवावर उठलेल्यांना शिव्या घातल्याच पाहिजेत
मराठी माणसाने लढाईत उतरावे
सरकारच्या लोकांना आचारसंहिता नाही
Sanjay Raut Shiv Sena MNS Alliance
मुंबई: मुंबई मराठी माणसाच्या हातून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाचा एक गट मराठी माणसापासून तोडण्यासाठी प्रयत्नात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी माणसासाठी एकत्र आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसाठी ते एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू लवकरच एका व्यासपीठावर एकत्र येऊन युतीची घोषणा करतील, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१६) माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, माध्यमांशी बोलल्यानंतर संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत.
जे महाराष्ट्राच्या जीवावर उठले आहेत, त्यांना शिव्या घातल्याच पाहिजेत. आम्ही मराठी माणसे ही मुंबई अमित शहा यांच्या घशात जाऊ देणार नाही. आता काहींना दिल्ली जाऊन आमच्याशी युती करा म्हणत डोकं ठेवायला लागले, सर्वांना माहीत आहे की, 'रहमान डकैत' कोण आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
संजय राऊत यांनी मराठी माणसाला या लढाईत उतरण्याचे आवाहन केले."मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, त्याने या लढाईत उतरायला हवे. मुंबईत मराठी माणसाला आवाहन करणारे पोस्टर एका रात्रीत काढायला लावले, पण 'सरकारच्या लोकांना आचारसंहिता नाही'?शासनाचे निधीसंदर्भातील आदेश निघत होते. हे सगळे झाल्यावर निवडणूक आयोग घोषणा करतो... याचा अर्थ 'पैशाचे वाटप जोरदार होणार आहे', असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस सोबत नाही: "काँग्रेस सोबत आहे असे दिसत नाही. बिहार निवडणुकीनंतर त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे. वरिष्ठांनी त्यांना स्थानिक पातळीवर ठरवा असे सांगितले आहे," असे राऊत यांनी स्पष्ट केले. "ईव्हीएम घोटाळा आहे. सुप्रिया सुळे देखील आधी घोटाळा आहे हे बोलत होत्या. सोयीनुसार भूमिका न बदलायला हवी," असा सल्लाही त्यांनी दिला.