मुंबई, पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीच्या काळात जनता मालक असते . जनतेच्या मनाप्रमाणे निवडणुकीचा कौल ठरत असतो अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (दि.४) दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, बेरोजगारीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल जेव्हा जनता भाजपाला उत्तर मागत होती. तेव्हा भाजपा जनतेच्या पैशाने जहिरातीच्या माध्यमातून लोकांमध्ये परपेक्शन बनवायचा प्रयत्न होती. निवडणूकीच्या काळात जनता मोठी असते. जनता मालक असते. सत्तेत बसलेले लोक जेव्हा मालकासारखा व्यवहार करत होते. राज्य आणि देशाला विकण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आम्ही मालक आहोत तुम्ही नाही, असं उत्तर देत परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला आहे. असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा :