Lok sabha Election 2024 Results : सांगलीत वसंतदादांची पुण्याई कायम, नातू विशालने लोकसभा जिंकली

Sangali Lok Sabha Election
Sangali Lok Sabha Election

पुढारी ऑनलाईन डेस्क: यंदाच्या लोकसभेत सांगली हा बहुचर्चित राहिलेला मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीतून लोकसभेचे तिकीट मिळाले नसल्याने विशाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना मविआकडून तिकीट देण्याचा निर्णय घेतला. तर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत लिफाफा या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली. दरम्यान विशाल पाटील यांना सांगलीतून विजयी आघाडी घेतली आहे. (Sangali Lok Sabha Election)

सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे सलग २० व्या फेरीत आघाडीवर आहेत. या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना 27416 मते मिळाली आहेत. 20 व्या फेरीअखेर विशाल पाटील 91563 मतांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सांगलीत विशाल पाटील यांच्या रुपाने वसंतदादांच्या वारसाला उर्जितावस्था (Sangali Lok Sabha Election) मिळाली आहे.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील हे सुरुवातीपासून आघाडीवर होते, त्यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत सांगली वसंत दादांची असल्याचे चित्र स्पष्ट केले आहे.

२० व्या फेरीअखेर 91563 मतांनी आघाडीवर

सांगली मतदारसंघ मतमोजणीच्या २० व्या फेरीअखेर भाजप उमेदवार पाटील यांना 21587 मते मिळाली आहेत. तर शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना 1898 मते मिळाली (Sangali Lok Sabha Election) आहेत.

कोण आहेत विशाल पाटील?

विशाल पाटील हे सांगलीचे चारवेळा खासदार राहिलेले प्रकाशबापू पाटील यांचे चिरंजीव तर राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री पाहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. विशाल पाटील यांचे मोठे बंधू प्रतीक पाटील हे सुद्धा 2 वेळा खासदार राहिले आहेत. सांगलीत वसंतदादा पाटील घराण्याचा दबदबा आहे. विशाल पाटील यांच्या १८ व्या लोकसभा विजयाने सांगलीत वसंतदादांची पुण्याई कायम असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news