Sunetra Pawar on Nana Patekar : अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…नाना पाटेकरांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची श्रद्धांजली

Sunetra Pawar on Nana Patekar: नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील
Sunetra Pawar on Nana Patekar
Published on: 
Updated on: 

Sunetra Pawar on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. अभिनयाचा एक युगपुरुष हरपला… असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…

सुनेत्रा पवार यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे. अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची असीम छाप उमटवली.

दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध

नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे. कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील. आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील

नाना पाटेकर यांच्यासारख्या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील, अशा शब्दांमध्ये सुनेत्रा पवारांनी नाना पाटेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news