BDD Redevelopment Mumbai: 864 बीडीडीवासीयांना महिनाअखेरीस मिळणार घरे

आचारसंहितेमुळे रखडले होते चावीवाटप
Redevelopment
Redevelopmentpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नव्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नायगाव बीडीडीवासीयांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर जानेवारीच्या अखेरीस 864 बीडीडीवासीयांना ताबा दिला जाणार आहे.

Redevelopment
Marathi Language Protest Mumbai: मराठी भाषेच्या आंदोलकांवरील गुन्हे अखेर रद्द; पोलिसांची माघार

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे बीडीडी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगावच्या 86 एकरवर असलेल्या 207 चाळींचा समावेश आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे.

Redevelopment
RTE Fee Reimbursement: दडपशाहीविरोधात संस्थाचालक आक्रमक

ना. म. जोशी मार्ग-परळ प्रकल्पामध्ये 2 हजार 560 निवासी व अनिवासी गाळे असून 14 पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव (दादर) येथे 3 हजार 344 निवासी व अनिवासी गाळे 20 पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.

Redevelopment
Municipal Elections: एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी?

नायगाव बीडीडी वसाहतीतील प्लॉट बी येथील चाळींमधील 864 रहिवाशांना घरांचा ताबा डिसेंबरमध्ये दिला जाणार होता. गेल्या महिन्यात चावीवाटपाचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू होते. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यामुळे चावीवाटप होऊ शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news