Marathi Language Protest Mumbai: मराठी भाषेच्या आंदोलकांवरील गुन्हे अखेर रद्द; पोलिसांची माघार

नागरिकांचा तीव्र विरोध, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार-पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
marathi language
मराठी Pudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी हुतात्मा स्मारक ते मुंबई महापालिका मुख्यालयादरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चाबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच माघार घेतल्याचे समोर आले आहे.

marathi language
RTE Fee Reimbursement: दडपशाहीविरोधात संस्थाचालक आक्रमक

सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर आधी गुन्हा दाखल करायचा आणि नंतर अचानक माघार घ्यायचीहा प्रकार पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीचा असलेला बेगडी कावा उघडकीस आला असून, पोलीस व सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

marathi language
Municipal Elections: एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी?

गेल्या महिन्यात 18 डिसेंबरला मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारक ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय या दरम्यान मुंबईतील मराठी शाळा वाचविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात मराठी अभ्यास केंद्राचे आनंद भंडारे, गिरीश सामंत, प्रणाली राऊत यांच्यासह अनेक मराठीप्रेमी कार्यकर्ते सहभागी होते. मात्र या मोर्चानंतर आयोजक व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 12 जानेवारी रोजी माझगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

marathi language
ZP Elections Maharashtra: झेडपी निवडणुका पुन्हा लांबणीवर? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष

समाजमाध्यमांवर सदर प्रकार समोर येताच सरकार व पोलिसांविरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त झाला. मराठी भाषेसाठी आंदोलन करणे हा गुन्हा ठरतो का, असा सवाल उपस्थित होताच काही तासांतच पोलिसांची भूमिका बदलल्याचे चित्र दिसले.

मराठीसाठी रस्त्यावर उतरायचा हक्क संविधान देते. मात्र निवडणुकीच्या गणितात तोच हक्क सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याने आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत नरमाईची भूमिका घेतली जात आहे, असा संशय पवार यांनी व्यक्त केला.

marathi language
Ward 26 BJP Campaign: मंत्री राणे–सामंतांच्या सभेने वॉर्ड 26 चे राजकीय समीकरण बदलले

माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश साबळे यांनी आंदोलकांशी फोनवर संपर्क साधून 12 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. मात्र गुन्हा अधिकृतपणे मागे घेण्यात आला आहे का, याबाबत कोणताही लेखी आदेश किंवा स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण कायमस्वरूपी मागे घेतले की केवळ तात्पुरते थांबवले, याबाबत संभ्रम कायम आहे. विशेष म्हणजे, काही आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे यापूर्वी पत्र दिलेच नव्हते, तरीही त्यांना हजर राहू नका, अशी पत्रे पाठवण्यात आली आहेत, असे मराठी अभ्यास केंद्राचे दिपक पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news