Promotion High Court Decision | पदोन्नती ही नियुक्तीच्या तारखेवर आधारित नसते; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Promotion High Court Decision |
Promotion High Court Decision | पदोन्नती ही नियुक्तीच्या तारखेवर आधारित नसते; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Published on
Updated on

मुंबई : पदोन्नती ही ज्येष्ठता कम गुणवत्ता या तत्त्वानुसार दिली जाते आणि ती नियुक्तीच्या तारखेवर आधारित नसते. सेवाज्येष्ठता फीडर कॅडरमध्ये मोजली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.

कर्मचारी पदोन्नतीसाठी किमान पात्रता आणि गुणवत्तेच्या आवश्यकता पूर्ण करतो, त्यावेळी तत्काळ कनिष्ठ कॅडरमधील ज्येष्ठता निर्णायक बनते. नियोक्ता पदोन्नती पदानुक्रम बदलण्यासाठी सेवेत रुजू झाल्याच्या तारखेकडे बोट दाखवू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पुणे महापालिकेतील कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. याचिकेवर न्यायमूर्ती आर. आय. छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तथापि, सेवेत रुजू झाल्याच्या तारखेकडे बोट दाखवून पदोन्नतीसाठी तो निकष मानता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news