Drugs Connection : मुंबईचे ड्रग्ज कनेक्शन कल्याणला भिडले

नेस्को सेंटरमध्ये ड्रग्ज पुरवणारा आनंद पटेल कल्याणमधून जेरबंद
Mumbai's Drugs Connection
Drugs Connection : मुंबईचे ड्रग्ज कनेक्शन कल्याणला भिडलेfile photo
Published on
Updated on

Mumbai's Drugs Connection Reaches Kalyan

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

मुंबईच्या गोरेगाव येथील मेस्को सेंटरमध्ये झालेल्या पार्टीत ड्रग्जचा पुरवठा करणारा पेडलर आनंद पटेल याला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. खडकपाडा पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आनंदला त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. मात्र त्यासाठी पोलिसांना जवळपास तासभर कसरत करावी लागली. पित्याच्या विनवणीनंतर आनंदने दार उघडले. आनंद पटेल याचे वडील लखन पटेल याच्या विरोधात देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai's Drugs Connection
Crime News | दृश्यम!

मुंबईच्या गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को सेंटरमध्ये शनिवारी ११ एप्रिल रोजी ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. तिथे उघडपणे ड्रग्ज सेवन सुरू होते. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यात २४ वर्षीय तरूणी आणि २८ वर्षीय तरूणाचा समावेश असून एमबीएसाठी शिक्षण घेणारे दोघेही नामांकित कॉलेजचे विद्यार्थी होते. तर एक २५ वर्षीय तरूणी सद्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या पार्टीमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणारा आनंद पटेल कल्याणमध्ये घरात लपला असल्याची पक्की खबर तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईचे तपास पथक सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री कल्याणमध्ये दाखल झाले. कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांना मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली होती.

Mumbai's Drugs Connection
Drugs mafia : अश्पाकची भरचौकात धिंड

त्यानुसार खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी भूषण देवरे यांच्या नेतृत्वाखाली किरण शिर्के, संजय चव्हाण, कुंदन भामरे, सुरज खंडाळे यांच्यासह मुंबई पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहन हाईट्स कॉम्प्लेक्सच्या खाली आनंदचे वडील लखन पटेल याला रोखले. लखन पटेल व्यवसायिक आहे. पोलिसांनी त्याला मुलाबद्दल विचारपूस केली. तेव्हा त्याने आपला मुलगा आनंद हा गावी असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. याच दरम्यान लखन पटेल याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना संशय आला.

टी-शर्ट/बर्मुड्यावर उचलले

मुलगा घरात लपला असून खोटी माहिती का देतोस, असा सवाल केल्यानंतर त्याला खाली यायला सांग, अशी तंबी दिली. परंतु लखन काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अखेर ज्या ठिकाणी आनंद राहतो त्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर पोलिस पोहोचले. परंतु घरातील लोक दार उघडायला तयार नव्हते. पोलिसांना यासाठी खूप कसरत करावा लागली. आनंद जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पोलिसांनी इशारा दिला. अखेर लखन याने मुलाला दार उघडायला भाग पाडले. दार उघडताच टी-शर्ट आणि बर्मुड्यावर असलेल्या ड्रग्ज पेडलर आनंद पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आनंद याचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे इतर नातेवाईक घरी मुक्कामी आले होते. खडकपाडा पोलिसांनी दप्तरी नोंद करून आनंदला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले.

बिल्डरचा मुखवटा घालून गोरखधंदे

गोरेगावच्या मेस्को सेंटरमध्ये झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जच्या पुरवठ्यात आनंद पटेल याची महत्त्वाची भूमिका आहे. पार्टीचा आयोजकाने ड्रग्जसाठी आनंदशी संपर्क साधला होता. आनंद याच्याशी आयोजकांची भेट घालून दिली होती. आनंद पटेल हा स्वतः बिल्डर असल्याचे सांगत आहे. मात्र पार्ट्यांसाठी ड्रग्जचा पुरवठा करणे हा त्याचा गोरखधंदा असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे वडील लखन पटेल यांच्याविरोधात देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. आनंद पटेल हा कल्याणसह आसपासच्या परिसरात देखील ड्रग्जचे वितरण वजा विक्री करत असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. स्थानिक पोलिस त्या अनुषंगाने देखील चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news