Drugs mafia : अश्पाकची भरचौकात धिंड

जिथे माज केला तिथेच ड्रग्ज माफियांची पोलिसांनी मस्ती जिरवली !
Drugs mafia
Drugs mafia : अश्पाकची भरचौकात धिंडfile photo
Published on
Updated on

Drugs mafia: Ashpak was taken away on foot from the main road

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील तरुण पिढीला नशेच्या खाईत लोटणाऱ्या ड्रग्ज सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार अश्पाक पटेल याची सोमवारी (दि.२३) पोलिसांनी चंपा चौक परिसरातून भररस्त्यात धिंड काढली. चार दिवसांच्या पोलिस कोठडीत येथेच्छ पाहुणचार घेतल्यानंतर, नार्कोटिक्स आणि गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बेड्या ठोकून त्याच्याच बालेकिल्ल्यात फिरवले. ज्या भागात अश्पाकने आपली दहशत निर्माण केली होती, तिथेच पोलिसांनी त्याची मान खाली घालायला लावून सर्व मस्ती उतरवली.

Drugs mafia
पदोन्नतीसाठी टीईटी नसलेल्या शिक्षकांचा विचार करता येणार नाही

पोलिसांना २६ दिवस गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार शेख अश्पाक ऊर्फ अश्पाक पटेल, पठाण दाऊद मुनावर खान आणि सरफराज मिर्झा हाफीज बेग हे नाशिकमधील एका हॉटेलात लपून बसले होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना याची माहिती मिळताच १८ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी पथकासह धाव घेत तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

या सिंडिकेटचा पर्दाफाश झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत २१ पेडलर्सना गजाआड केले आहे. अश्पाक हा बंद मेडिकल परवाने असलेल्या व्यक्तींना हाताशी धरून नशेचा काळाबाजार चालवत होता. त्याची मैत्रीण इशरत ही या सिंडिकेटचा संपूर्ण आर्थिक हिशेब सांभाळायची. तिच्या बँक खात्यात लाखोंचे व्यवहार झाले असून, ती अश्पाकला रोख रक्कम पुरवण्याचे काम करत होती. सध्या अश्पाकचा पार्टनर हाफिज आणि इतर काही साथीदार फरार असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

Drugs mafia
Unseasonal Rain : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणीला अवकाळीचा फटका

रस्त्यावर गर्दी, माफियाची मान झुकली

सोमवारी न्यायालयाने अश्पाक आणि त्याच्या साथीदारांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एपीआय रविकांत गच्चे आणि पीएसआय जगन्नाथ मेनकुदळे यांच्या पथकाने आर-ोपींना हातकड्या घालून चंपा चौक, रवींद्रनगर, शहाबाजार आणि शहागंज भागात फिरवले. कालपर्यंत दहशत माजवणारा अश्पाक लोकांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता; तो संपूर्ण वेळ मान खाली घालून चालत होता. धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.

ड्रग्ज विरोधात झिरो टॉलरन्स !

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या दीड वर्षात तब्बल ४०० आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, ६० हून अधिक जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. नशेचा बाजार करणाऱ्यांच्या अतिक्रमित घरांवर आता महापालिकेच्या माध्यमातून बुलडोझर चालवला जाणार असल्याने ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news