Mumbai Police: बापरे! मुंबईत थेट महिला पोलिसाचाच छळ; पतीने गळ्यातील मंगळसूत्र तोडले, चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai female cop husband harassment: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस शिपायाला पतीने शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या छळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai Police
Mumbai Policefile photo
Published on
Updated on

Mumbai female cop husband harassment

मुंबई: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस शिपायाला पतीने शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या छळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या अनेक वर्षे सुरू असलेल्या त्रासाला, दागिन्यांचा अपहार, आर्थिक फसवणूक, मारहाण आणि धमक्यांना कंटाळून अखेर या महिला पोलिसाने चेंबूर पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

स्वतः कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यावरच अशी वेळ आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. चेंबूर पोलिसांनी पीडित महिला पोलिसाच्या तक्रारीवरून पती सुमित साळुंखे याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Mumbai Police
Ambad Crime News : 10 हजार रुपये दे, नाही तर जिवे मारील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलीस शिपाई आणि आरोपी सुमित साळुंखे यांची २०१६ मध्ये ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी विवाह केला. मात्र, हा विवाह संबंध तिच्यासाठी छळवणुकीचा ठरला.

विवाहपूर्वी आणि नंतरही लाखो रुपयांची मागणी

महिला पोलिसाने दिलेल्या तक्रारीनुसार, सुमितने विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही तिच्याकडे सातत्याने पैशांची मागणी केली. कधी नोकरीचे तर कधी व्यवसायाचे कारण सांगून त्याने तिच्याकडून लाखो रुपये उधार घेतले. एवढेच नव्हे तर, तिने त्याच्या त्रासाला कंटाळून घटस्फोटासाठी नोटीस पाठवली असता, त्याने दीड लाख रुपयांहून अधिक रकमेची मागणी करत तिला 'तुझी पोलीस दलातील नोकरी घालवेन' अशी धमकी दिली.

मंगळसूत्र खेचल्याने प्रकरण पोलिसांत

हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. चेंबूर येथील निवासस्थानी दोघांमध्ये झालेल्या एका वादादरम्यान, पतीने संतापाच्या भरात या महिला पोलिसाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून घेतले. पतीकडून वारंवार होणारा छळ, दागिन्यांचा अपहार, आर्थिक फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमक्या यामुळे अखेर सहनशीलतेचा अंत झालेल्या महिला पोलीस शिपायाने चेंबूर पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला.

Mumbai Police
Shocking crime news : लग्न झाले, ४ दिवस उलटले अन्...; फक्त एका सोन्याच्या चेनसाठी नववधूला जिवंत जाळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news