Mumbai Water Supply Update: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; तलावांतील पाणीसाठा ९० टक्क्यांवर

तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे चार तलाव कधीच ओसंडून वाहू लागले.
Mumbai Dam
Mumbai Dampudhari photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ९०टक्केवर पोहचला आहे. म्हणजेच १३ लाख दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला असून अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा व भातसा हे तलाव भरण्यासाठी जेमतेम १ लाख ४४ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.

तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे चार तलाव कधीच ओसंडून वाहू लागले. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठा ८८ टक्केवर पोहचला आहे. हा तलाव भरण्यासाठी ८३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मध्यवैतरणा तलावातील पाणीसाठाही ९२ टक्केवर पोहचला आहे.

Mumbai Dam
Human Milk Bank: कामा रुग्णालयाच्या मानव दूध बँकेचा तीन वर्षांत विक्रम

तलावातील पाणीसाठा दशलक्ष (लिटर्समध्ये)

अप्पर वैतरणा - १,८१,९४९ ( ८० टक्के)

मोडक सागर - १,२८,९२५ ,(१०० टक्के)

तानसा - १,४५,०८० (१०० टक्के)

मध्य वैतरणा - १,७८,३३९ (९२ टक्के)

भातसा - ६,३४,०६८ (८८ टक्के)

तुळशी - २७,६९८ (१०० टक्के)

विहार - ८,०४६ (१०० टक्के)

Mumbai Dam
Mumbai Health Alert: मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले

३ वर्षातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

३ ऑगस्ट २०२४ - ११,८६,१९७ (८१ टक्के)

३ ऑगस्ट २०२५ - १२,८९,४५५ (८९ टक्के)

३ ऑगस्ट २०२६ - १३,०३५,०० (९० टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news