Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! दोन दिवस १५% पाणीकपात

शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Mumbai Water Cut
Mumbai Water CutPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईत आधीच १० टक्के पाणीकपात सुरु असताना आता पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील विद्यमान ६.६ के.व्ही. उच्च दाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे.

यामुळे मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्‍या २० तासांच्‍या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पांजरापूर येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही भागास पाणीपुरवठ्यात १५% कपात करण्यात आली आहे.

Mumbai Water Cut
MHT CET Result Viral Video: MHT-CET निकालावर व्हायरल व्हिडीओंनी खळबळ! सीईटी कक्षाची सायबर पोलिसांकडे धाव

पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील ६.६ के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत विद्यमान १० जुन्या उच्चदाब नियंत्रण पॅनेलच्या जागी अत्याधुनिक व कार्यक्षम अशा १० नवीन उच्च दाब नियंत्रण पॅनेलची स्थापना करण्यात येणार आहे.

Mumbai Water Cut
MPSC Drug Inspector Paper Leak: ‘एमपीएससी’ने पेपरफुटीची चौकशी १५ दिवसांत करावी; रोहित पवार यांची मागणी

पहिल्‍या टप्प्या अंतर्गत एकूण १० उच्चदाब कंट्रोल पॅनलपैकी ४ उच्चदाब कंट्रोल पॅनल प्रथम बदलण्यात येणार आहेत. हे काम मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ‘मुंबई ३ अ उदंचन केंद्र’ सुमारे २० तास बंद ठेवणे अपरिहार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news