Pankaja Munde: ‘मिठी’ पुनरुज्जीवन कामांचा पंकजा मुंडेंकडून आढावा

राडारोडा व्यवस्थापनासाठी ऑनलाइन यंत्रणा
Pankaja Munde
Pankaja MundePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि मिठी नदी पुनरुज्जीवनाच्या कामांचा राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी आढावा घेतला.

मुंबई महापालिका प्रशासनाकडून या क्षेत्रांत सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, कचऱ्याचे विलगीकरण अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित करताना नागरिकांनीही स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Pankaja Munde
Govandi Pollution Case: गोवंडीकरांच्या १७ वर्षांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश! एसएमएस कंपनीचा प्रकल्प स्थंलातरित

पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका मुख्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (घकव्य) किरण दिघावकर उपस्थित होते.

मुंबईत बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ‘मुंबई डेब्रिज कंट्रोल अँड ट्रॅकिंग सिस्टीम’ ही ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे.

Pankaja Munde
Mumbai Cyber Crime Cases: मुंबईकरांनो सावधान! सायबर गुन्ह्यांत ४४ टक्क्यांची वाढ

पालिकेच्या कार्याची मंत्र्यांकडून प्रशंसा

मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन हे आव्हानात्मक काम असल्याचे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या की, कचऱ्याचे विलगीकरण अधिक प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच महापालिकेकडे द्यावा.

राडारोडा व्यवस्थापनासाठी विकसित केलेली यंत्रणा आणि मलजल प्रक्रिया केंद्रांची उभारणी ही महत्त्वाची पावले आहेत. मिठी नदीसाठी महापालिका करत असलेले टप्पेनिहाय काम समाधानकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news