Mumbai University Budget: मुंबई विद्यापीठाचा 1,054 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; संशोधन व कॅम्पस विकासाला प्राधान्य

अर्थसंकल्पाचा आकार वाढला तरी तूट 172.63 कोटींवर; अधिसभेपूर्वी सिनेट सदस्यांचे आंदोलन
Mumbai University Budget
Mumbai University BudgetPudhari
Published on
Updated on

मुंबई : संशोधन, आंतरराष्ट्रीयीकरण, विद्यार्थी कल्याण आणि कॅम्पस विकासाला प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी भरीव तरतुदी करत मुंबई विद्यापीठाचा 2026-27 या वित्तीय वर्षाचा रुपये 1 हजार 54.12 कोटींचा अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या अधिसभेत या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली.

Mumbai University Budget
Divyang Empowerment Maharashtra: दिव्यांग कल्याण विभागाचे ‘दिव्यांग सक्षमीकरण विभागात’ रूपांतर; 172 नवी पदे मंजूर

गेल्यावर्षी 2025-26 या वित्तीय वर्षात विद्यापीठाचा 968.18 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता, ज्यामध्ये 147.63 कोटींची तूट दाखविण्यात आली होती. यंदा अर्थसंकल्पाचा आकार वाढला असला तरी तूटही वाढून 172.63 कोटींवर पोहोचली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

वित्तीय वर्ष 2026-27 मध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि सीएसआर अंतर्गत 187 कोटी रुपयाचा निधी प्राप्त होणार असून यामध्ये केंद्र शासनाकडून 129.56 कोटी, राज्य शासनाकडून 33 कोटी, सीएसआर अंतर्गत 13.91 कोटी आणि मुंबई विद्यापीठाकडून रुपये 10 कोटी अर्थसंकल्पीय तरतूदीचा समावेश आहे.

अर्थसंकल्प वित्त व लेखा अधिकारी सीए. हर्षल वाघ यांनी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या उपस्थितीत अधिसभेसमोर सादर केला.

Mumbai University Budget
Asiatic Society Election: ‘एशियाटिक सोसायटी’ची निवडणूक ऐनवेळी स्थगित; धर्मादाय आयुक्तांकडून प्रशासक नियुक्त

मुंबई विद्यापीठात विविध नाविण्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामे सुरु करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (2 रा टप्पा), पीएम-उषा अंतर्गत 50 क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची इमारत, तृतीय व चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह, जीआर संबंधित नूतनीकरण, पीएम-उषा अंतर्गत एमयू-आयडीईएचएस इनक्युबेशन, मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील टिळक भवन या इमारतीचे नूतनीकरण, क्रीडा संकुल या इमारतीचे नूतनीकरण, जवाहरलाल नेहरू ग्रंथालय या इमारतीचे नूतनीकरण, महात्मा ज्योतिबा फुले परीक्षा केंद्र या इमारतीचे नूतनीकरण, लाइफ सायन्स इमारतीचे नूतनीकरण, शंकरराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण, जगन्नाथ शंकरशेठ हॉल, नवीन व्याख्यान संकुल इमारतीचे नूतनीकरण,

Mumbai University Budget
Deepak Pawar Urban Naxal: मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार ‘शहरी नक्षलवादी’? सिनेटमधील स्थगन प्रस्तावावरुन नवा वाद

आरोग्य केंद्र इमारतीचे नूतनीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतींसमोरील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, ठाणे उपकॅम्पसमध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण, 100 केडब्ल्यूपी सौर ऊर्जा प्रणालीची पुरवठा, स्थापना, चाचणी व कार्यान्वयन तसेच 5 वर्षांचा एएमसी करार, कंपाऊंड वॉल बांधकाम प्रस्ताव, ड्रेनेज बांधकाम प्रस्ताव, क्रीडा सुविधांच्या बांधकामाचा प्रस्ताव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे 20 केडब्ल्यू सौर ऊर्जा प्रणालीचा पुरवठा व स्थापना, राजाबाई टॉवरच्या बाह्य व आंतरिक दिव्यांचे पुनर्स्थापन, विद्यानगरी कॅम्पसमध्ये 175 केडब्ल्यू सौर ऊर्जा प्रणाली तसेच 70 सौर रस्ते दिव्यांचा पुरवठा व स्थापना, दीक्षांत सभागृहाचे पुनर्स्थापन आदींचा समावेश आहे.

Mumbai University Budget
Maharashtra Cooperative Credit Society: पतसंस्थांतील ठेवींना मिळणार विमा संरक्षण; राज्य सरकारची महत्त्वाची पावले

अधिसभेपूर्वी सिनेट सदस्यांचे आंदोलन

मुंबई : सिनेट पार्श्वभूमीवर शनिवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर युवासेना सिनेट सदस्यांनी फलक आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचडे, परमात्मा यादव, मयूर पांचाळ, किसन सावंत आणि स्नेहा गवळी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

नवीन ग्रंथालय इमारत, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा, तरणतलाव पूर्णत्वास नेणे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे तसेच विविध पायाभूत प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशा मागण्या फलकांद्वारे करण्यात आल्या. सिनेट बैठकीत मुद्दे उपस्थित करूनही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासन केवळ आश्वासने देत असल्याची टीका सदस्यांनी केली.

Mumbai University Budget
Naigaon BDD Redevelopment: नायगाव बीडीडी चाळींच्या 864 कुटुंबांना नव्या घरांचा ताबा; गुढीपाडव्यापूर्वी मोठी भेट

कुलगुरूंच्या विशेष क्रमांकाच्या गाडीत सामानाचा साठा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त तत्कालीन कुलगुरूंसाठी खरेदी करण्यात आलेली ‌‘एमएच-01 बीके 1857‌’ विशेष क्रमांकाची गाडी फोर्ट संकुलात धूळ खात उभी असून तिचा वापर उपहारगृहाच्या मालकाकडून सामान साठवण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. अधिसभेपूर्वी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी ही बाब कुलसचिवांच्या निदर्शनास आणून देत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच या गाडीचा लिलाव करून मिळणारी रक्कम विद्यापीठाच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news