Charkop Building Vibration: चारकोपमध्ये पायलिंग कामामुळे इमारतींना हादरे; व्हीजेटीआय पथकाची तातडीची पाहणी

वर्सोवा-भाईंदर सागरी मार्ग प्रकल्पादरम्यान कंपनांची मोजणी; नागरिकांच्या भीतीनंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन
Building
BuildingPudhari
Published on
Updated on

मुंबई : वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्गासाठी कांदिवली चारकोप सेक्टर 8 परिसरामध्ये माती परीक्षण आणि पायलिंगचे काम सुरू असताना इमारतींना हादरे बसले. या इमारतींची शनिवारी व्हीजेटीआय पथकाकडून पाहणी करण्यात आली.

Building
Maharashtra Cinema Ticket Price: महाराष्ट्रात चित्रपट तिकिटे १५०–२०० रुपयांत? अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता

या प्रकारामुळे चारकोप श्री गजानन को-ऑप हाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या इमारतीला हादरे बसल्याने घरातील खिडक्यांची तावदाने वाजली, वस्तू हलल्याचे नागरिकांना जाणवले.

Building
Mumbai Marriage Registration: मुंबईत दरवर्षी ३० ते ३५ हजार विवाह नोंदणी; पालिकेच्या नागरी केंद्रांवर वाढती गर्दी

या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी व्हीजेटीआयचे डीन अभय भांबोले यांनी चारकोप येथील काम सुरु असलेल्या साइटला भेट दिली. यावेळी त्यांनी कामामुळे होणाऱ्या कंपनांच्या आवाजाची मोजणी केली असून काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांच्या मनातील शंका व भीती दूर करण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news