

मुंबई : पुढरी वृत्तसेवा : गणवेशात इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्या दोन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे पोलिसांत चर्चा रंगली आहे. Mumbai railway police
गणवेशात कर्तव्यावर असताना रिल्स बनवून त्या सोशल मिडियावर अपलोड केल्याप्रकरणी दोन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका महिला पोलिसांचा समावेश आहे. मध्य रेल्वे अंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस व पश्चिम रेल्वे अंतर्गत पोलिस ठाण्यातील एक पोलिस शिपाई यांनी काही दिवसांपुर्वी गणवेशात रिल तयार करुन ती सोशल मिडियावर शेअर केली होती. याबाबत वरिष्ठांना माहिती मिळताच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी सुरु असेपर्यंत दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. Mumbai railway police
गणवेशात असताना शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु शिस्तीचे पालन न केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत असल्याने रेल्वे पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. याशिवाय वसई रेल्वे पोलीस ठाण्यात दोन पोलिसांवर कोचिंग सेंटर चालवल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली आहे. सेवा नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
हेही वाचा