Mumbai Startup Innovation Hub: मुंबईत जागतिक दर्जाचे स्टार्टअप इनोव्हेशन हब; अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प

वडाळ्यात 130 एकरवर प्रकल्प, ‘तिसरी-चौथी मुंबई’ उभारणीची घोषणा; 10 लाख परवडणाऱ्या घरांचेही नियोजन
Mumbai Startup Innovation Hub
Mumbai Startup Innovation HubPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 140 अब्ज डॉलरवरून 300 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट असून यासाठी वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्ट- अप आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी 130 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले.

Mumbai Startup Innovation Hub
Maharashtra Budget 2026: ‘नवमहाराष्ट्राची गुढी’ उभारणारा अर्थसंकल्प; 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

130 एकर जमिनीचे वाटप

शाश्वत शहरी विकासासाठी 10 हून अधिक सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे, 50 हून अधिक सुनियोजित, बहुपयोगी शहरी समूह विकसित करण्यात येणार आहेत. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा 100 टक्के डिजिटाईज करणार असल्याचे फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

Mumbai Startup Innovation Hub
Maharashtra Budget Farmer: कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारवर ठाकरे यांचा हल्लाबोल

तिसरी, चौथी मुंबई

अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येईल. याबरोबर पालघरजवळ वाढवण येथे चौथी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. या भागात लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Mumbai Startup Innovation Hub
Mumbai Water Transport: मुंबईत जलवाहतुकीला मोठी चालना; 340 किमी जलमार्गांचे जाळे उभारणार

10 लाख परवडणारी घरे

मुंबई महानगर प्रदेशात 20 लाख झोपडपट्टी धारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी घरांचे प्रकल्प उभारले जातील. 10 लाख परवडणारी घरेही बांधली जातील. मुंबई महानगर प्रदेशात नवीन झोपडपट्टी होणार नाही, बेकायदेशीर बांधकामे होणार नाहीत यासाठी ‌‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क‌’ प्रणाली विकसित करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news