

Car Viral Video Mumbai Speeding Car Incident
मुंबई: मुंबईतील एअरपोर्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. किरकोळ बाचीबाचीतून तरुणाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी तरुण कारच्या बोनेटवर चढला. त्या तरुणाला तसाच बोनेटवर अडकवून वेगाने कार चालविण्यात आली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा तरुण बोनेटवर अडकलेला असताना ड्रायव्हर ७० च्या स्पीडने कार चालवत होता. तर तरूण जीवाच्या आकांताने कार थांबविण्याची विनंती करत होता. या प्रकरणी कार चालक भीमकुमार महतो याच्याविरोधात एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले आहे.