Mumbai Rains : मुंबई का तुंबली? सहा कारणे जाणून घ्या

मुंबई महानगरात सोमवारी पहाटेपासून तुफान कोसळलेल्या पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली.
Mumbai Rains
Mumbai Rains : मुंबई का तुंबली? सहा कारणे जाणून घ्याFile Photo
Published on
Updated on

Mumbai flooded in the first rain since Monday morning

मुंबई : प्रकाश साबळे

मुंबई महानगरात सोमवारी पहाटेपासून तुफान कोसळलेल्या पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली. यामुळे मुंबई महापालिकेने केलेल्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल झाली. मुंबईतील हिंदमाता, सायन-किंग्ज सर्कल, चर्चगेट, नरिमन पॉईंट, कुलाया, जे.जे. उड्डाणपूल, काळाचौकी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अंधेरी सबवे, मिलन सबवे, दहिसर, मालाड हे भुयारी मार्ग पाण्याखाली गेले होते.

Mumbai Rains
Maharashtra Transport News| भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा

मुंबई शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हिंदमाता परिसरात बंदा पावसाचे पाणी साचणार नसल्याचा मुंबई महापालिकेचा दावा अक्षरशः फोल ठरला. पालिकेकडे या परिसरातील पर्जन्यजल वाहिन्यांच्या सक्षमीकरण व पुनर्खाधकामाची कामे होती. हिंदमाता येथील जल साठवण टाकी, सात उपसापंप, मुख्य जलवाहिनी, प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकी, सेंट झेव्हियर्स मैदान मेधील साठवण टाकी यांच्यामुळे सावलेल्या पाण्याचा निचरा वेगाने होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता, मात्र सोमवारच्या पहिल्याच पावसाने तो दाखवून दिला आणि पालिका प्रशासन चांगलीच तोडघशी पडली.

एवढेच नव्हे, तर दोन्ही साठवण टाक्यांची क्षमता ही ६.४८ कोटी लिटर इतकी केली होती. त्यामुळे भरतीच्या काळात जोरदार पावसामुळे साचणारे पाणी साठवण्याची सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईल. परिणामी, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम हॉस्पिटल), टाटा कर्करोग रुग्णालय, साडिया रुग्णालय या महत्वाच्या परिसरात वैद्यकीय उपचारांसाठी वेणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचा महापालिकेचा दावाही पावसाने खोडून काढला.

Mumbai Rains
Navi Mumbai Rains | नवी मुंबईला पावसाने झोडपले, १२ तासांत १०० मिमी पाऊस, १५ ठिकाणी झाडे कोसळली

१ कुठे गेले फ्लड गेट, पाणी साठवण टाक्या, मिनी पंपिंग स्टेशनच्या उपाययोजना :

महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून आरसीसी पॉक्स ड्रेन, मायक्रो टनेलिंग, फ्लड गेट, पाणी साठवण टाक्या, मिनी पंपिंग स्टेशन यांसारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा जलद उपसा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या, त्यमुळे, यंदा हिंदमाता, भरणी नाका (बडाळा अधिशमन केंद्र) भायखळा, शीव (सायन) आणि माटुंगा स्थानक, महालक्ष्मी स्थानक, नावर ररुग्णालय या अतिशय सखल परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार होता, या सर्व उपाययोजना मान् सूनच्या पहिल्याच पावसात नापास झाल्या.

पंपिंग स्टेशन ठरले कुचकामी : 

२ महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरात मिनी पंपिंग स्टेशन, नायर रुग्णालय तसेच, मोरलैंड मार्ग, एम.ए. मार्ग, मराठा मंदिर जंक्शन, जेष्ठव सर्कल (सात-रस्ता) या विभागातील सखल परिसरात जास्त पाऊस झाल्यानंतर वारंवार पाणी साप्ते, याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने १२०० मिमी व्यासाच्या दोन वाहिन्या अंथरल्या होत्या. महालक्ष्मी रेल्वे कल्व्हर्टपासून डॉ. ई. मोळेस मार्गावरील फेमस स्टुडिओ बसथांब्यापर्यंत जी दक्षिण विभागाच्या हद्दीतील कामात डबल बॅरल बॉक्स ड्रेनमधून या वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम रेल्वेच्या आवारात मिनी पंपिंग स्टेशन उभारले. ताशी ३ हजार घनमीटर क्षमतेचे सकमर्सियल पंप याठिकाणी बसवले, मात्र तरीसुद्धा हे परिसर जलमय झाले. एफ दक्षिण विभागात वडाळा अश्रितमन केंद्र येथील भरणी नाका परिसरात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ९०० मिमी व्यासाची वाहिनी अंथरली होती. त्यासोबतच वडाळा अग्निशमन केंद्र परिसरात मिनी पंपिंग स्टेशन उभारले होते. तसेच ३ हजार पनमीटर क्षमतेच्या दोन पंपांच्या मदतीने पावसाचे पाणी उपसा करण्यात येणार होते, त्यामुळे यापूढे भरणी नाका आणि वडाळा येथे पावसाचे पाणी साचण्याच्या गैरसोयीपासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे पालिकेने सांगितले होते, मात्र तिथेही पाणी साचले.

Mumbai Rains
Mumbai Corona News | मुंबईत कोरोना रुग्ण ३७ वर; केरळनंतर महाराष्ट्र

३ उशिरा सुरू केलेली नालेसफाई :

२५ मार्चपासून महापालिका प्रशासनाने पारदर्शक आणि विविध अटी व शर्ती टाकून उशिरा नालेसफाई सुरु केली. त्याचा फटका आता पहिल्या पावसात बसलेला दिसून आला. आतापर्यंत संपूर्ण मुंबईतील फक्त ७१.६१ टक्के नाले सफाई झालेली आहे. ती किमान ८० ते ८५ टके होणे अपेक्षित होते, असे जाणकारांचे म्हणणे असो. मुंबईत जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात नालेसफाई सुरु होते, मात्र यंदा निविदा प्रक्रिया उशिरा राबविल्याने मार्च महिन्यांच्या अखेरीस नालेसफाई सुरु झाली. मुंचईला तुंबई करण्यामध्ये माले सफाईच्या कामाला उशिरा झालेला श्रीगणेशासुध्दाही कारणीभूत आहे.

४ लहान गटारीची सफाई अजूनही सुरु :

सत्यालगत असलेल्या पदपथाखालील ४ ते ५ फूट गटारीची गाळ आणि कचरा काढण्याचे क्यम अद्यापही सुरु आहे. अनेक ठिकाणी ही गटारे व्यवस्थित साफ न झाल्याने रस्त्याचे पाणी त्या गटारीत जात नसल्याकारणाने ते रस्त्यावर साचत आहे. यामुळे या गटारीतील गाळही जैसे चेच असल्याने परिणामी पावसात रस्त्यावर पाणी भरताना दिसून येत आहे.

Mumbai Rains
Mumbai Rain : मुंबईवर मान्सून ‘स्ट्राईक’!

५ मिठीची फक्त ५३ टक्के सफाई :

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांला तुंबण्यासाठी कारणीभूत ठरणारी मिठी नदीतील गाळ आतापर्यंत फक्त ५३.१० टक्के काढण्यात आला आहे. आतापर्यंत तिची किमान ८० ते ८५ टक्के सफाई पूर्ण झालेली पाहिजे होते, परंतु ती करण्यास पालिका आणि कंत्राटदार अपयशी ठरल्याने कुर्ला, जरिमरी, विमानतळ, सहार गाव, वाकोला, गांधीनगर या भागात पाणी साचले होते. यामुळे मान् सूनपूर्व मिठी नदीचे किमान ९० टक्के सफाई न झाल्यास प्रपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.

६ सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे अपूर्ण :

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अद्यापही रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे अपूर्ण आहेत. पालिका प्रशासनाने २५ मेपर्यंत उवरित ठिकाणी डांबरीकरण रस्ता करण्याचे निर्देश दिल्यानंतरसुध्या संबंधित कंत्राटदारांकडून रस्ता खोदणे सुरु आहे. तसेच काही ठिकाणी सता खोदल्यामुळे रस्त्याचे पाणी गटारात जाण्यात प्रतिचंच झाले आहे. यामुळे ते सत्यावर साचून राहात असल्याने त्यांचा निचरा होताना दिसून येत नाही, तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कंत्राटदारांकडून कुठलीही उपाययोजनासुद्धा करण्यात आलेल्या नाहीत, यामुळे या समस्यांचासुध्दा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news