Mumbai Concrete Roads: दक्षिण मुंबईतील काँक्रीटीकरणाचे काम केवळ १५ टक्के; कंत्राटदाराचा करार रद्द करण्याची मागणी

शहरातील महत्त्वाच्या भागांत कामे रखडलेलीच
Mumbai Concrete Roads
Mumbai Concrete RoadsPudhari
Published on
Updated on

मुंबई: दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांना मोठा विलंब होत असल्याने कुलाबा येथील भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांना पत्र लिहून एनसीसी लिमिटेडला देण्यात आलेले कंत्राट तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या तीन वर्षांत केवळ १५ टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दक्षिण मुंबईतील या प्रकल्पासाठी मे २०२४ मध्ये एनसीसी लिमिटेडला १, हजार ३०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. या प्रकल्पाला २०२३ पासूनच मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराने काम सुरू न केल्याने प्रकल्पाला विलंब झाला. त्याचे कंत्राट रद्द केल्यानंतर एनसीसी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली.

Mumbai Concrete Roads
Mumbai Ganpati Aagman 2026: मुंबईत शंभरहून अधिक सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती मंडपात दाखल

महापालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, दक्षिण मुंबईतील झोन १ मध्ये सीसी रस्त्यांच्या कामाची प्रगती सर्वांत संथ आहे. या झोनमध्ये कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, चर्चगेटपासून डोंगरी, मोहम्मद अली रोड, भुलेश्वर, मलबार हिल, भायखळा, मुंबई सेंट्रल व नागपाडा या परिसरांचा समावेश होतो.

१२७ रस्त्यांच्या कामांना मुहूर्ताची प्रतीक्षा

झोन १ मध्ये एकूण ३३५ रस्त्यांचे काँक्रीटीकरण प्रस्तावित असून त्यांची एकूण लांबी ८३.४१ किलोमीटर आहे. त्यापैकी केवळ १४५ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ६३ रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत रखडली असून, तब्बल १२७ रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

Mumbai Concrete Roads
Konkan Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी २५ लाख चाकरमानी जाणार कोकणात; रेल्वे, एसटी फुल्ल

कंत्राटातील जबाबदारी पार पाडण्यास अपयश

या मोठ्या सार्वजनिक कंत्राटातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एनसीसी लिमिटेडची अपुरी क्षमता आणि कामातील तातडीचा अभाव दिसून येतो. महापालिकेने कंत्राटातील दंडात्मक तरतुदी लागू करून एनसीसी लिमिटेडचे कंत्राट तातडीने रद्द करावे, अशी मागणी मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news