Mumbai Infrastructure News | मुंबईकरांना मिळणार दुसरे मरिन ड्राइव्ह!

Mumbai Coastal Road | प्रियदर्शनी पार्क ते वरळीपर्यंत जॉगिंग, सायकल आणि फिरण्यासाठी रस्ता
Second Marine Drive
Mumbai Coastal Road(File Photo)
Published on
Updated on

Second Marine Drive

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांत समुद्राच्या लाटा अंगावर घेत केले जाणारे पर्यटन किंवा जॉगिंग आतापर्यंत केवळ मरिन ड्राइव्ह परिसरात दिसत होत्या. आता लवकरच मुंबईकरांना आणखी एक मरिन ड्राइव्ह मिळणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळीपर्यंत विशिष्ट मार्गिका उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण 15 जूनला होण्याची शक्यता आहे.

ब्रीच कॅण्डी येथील प्रियदर्शनी पार्क ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळी टोक या 7.5 किमी मार्गावर हे नवीन मरिन ड्राइव्ह असेल. दर 400 मीटरवर एक अशाप्रकारे 20 भुयारी मार्गिका यात असतील. याद्वारे समुद्राच्या दिशेला आणि त्याच्या विरूद्ध बाजूला जाता येईल. 12 हेक्टरचा हा परिसर पालिकेने विकसित केला आहे. सागरी किनारा मार्गालगत 70 हेक्टर मोकळी जागा निर्माण करण्याच्या प्रकल्पाचा भाग म्हणून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

Second Marine Drive
Mumbai News | मनोरीत खारे पाणी गोडे करण्यासाठी निविदा

मरिन ड्राइव्हला पर्यटकांची गर्दी वाढते आहे. दुसर्‍या बाजूला विविध पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यांमुळे मुंबईतील मोकळ्या जागा कमी होत आहेत. अशावेळी मुंबईकरांना जास्तीत जास्त मोकळ्या जागांचा पर्याय मिळावा या उद्देशाने सागरी किनारा मार्गालगत ही विशिष्ट मार्गिका उभारली जात आहे.

Second Marine Drive
Mumbai Infrastructure | महामुंबईच्या सुविधांसाठी ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर

* या मार्गिकेत 70 टक्के हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे.

* 30 टक्के भागात पायवाट, जॉगिंग ट्रॅक, सायकल मार्गिका असणार आहे.

* पर्यटकांना बसण्यासाठीही वैशिष्ट्यपूर्ण जागा करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news