Ashray Scheme Mumbai: मुंबईत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास महागला; खर्चात ८३ कोटींची वाढ

पश्चिम उपनगरातील गोरेगाव, कांदिवली, बोरिवली वसाहतींच्या खर्चात ८३ कोटींनी वाढ
Ashray Scheme Mumbai
Ashray Scheme MumbaiFile Photo
Published on: 
Updated on: 

राजेश सावंत

मुंबई: आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास सुरू आहे. परंतु हा पुनर्विकास महागला असून पश्चिम उपनगरातील वसाहतीच्या खर्चामध्ये तब्बल ८३ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तिन्ही वसाहतीचा खर्च आता १८० कोटी ६१ लाख रुपयावर पोहचला आहे.

सफाई कामगारांना सुसज्ज व मोठी घरे मिळावी यासाठी आश्रय योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास सुरू आहे. गोरेगाव जे. पी. नगर, कांदिवली आकुर्ली रोड व बोरीवली नाका येथील घनकचरा विभागाच्या जागेवर पूर्वी अस्तित्वात असलेल्या चाळी तोडून त्या ठिकाणी नवीन बहुमजली इमारती बांधण्यात येत आहेत.

Ashray Scheme Mumbai
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात; जाणून घ्या कारण

२०२१ मध्ये याबाबत स्थायी समितीत निर्णय घेण्यात आला होता. या वसाहतीमधील इमारतीच्या पुनर्विकासाकरिता सुरुवातीला ९७ कोटी ८१ लाख रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती.

परंतु अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे बांधकाम क्षेत्रफळात ८०८७ चौरस मीटरने वाढ होत असल्याचे सांगत पुनर्विकासाचा खर्च १५८ कोटी १७ लाखावर नेला. म्हणजे जवळपास पुनर्विकासाच्या खर्चात ६१ कोटी रुपयांनी वाढ झाली.

Ashray Scheme Mumbai
Maharashtra Water Shortage: राज्यातील चार जिल्ह्यांत ७०० टँकरने पाणीपुरवठा; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

या तीनही वसाहतीच्या पुनर्विकासाचा खर्च थांबला नसून अजून २१ कोटी ९० लाख रुपये खर्च वाढला आहे. त्यामुळे या वसाहतीच्या पुनर्विकासाचा खर्च ८३ कोटी रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे ९७ कोटी रुपयांमध्ये होणाऱ्या या पुनर्विकासासाठी आता १८० कोटी ६१ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

इमारतीच्या पुनर्विकासाच्या आराखड्यांना मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महापालिका वास्तुशास्त्रज्ञ यांनी अग्निशमन दलाच्या आवश्यकतेनुसार तसेच अधिक चांगल्या प्रकारे वायू विजन रुंद पॅसेज आणि कम्युनिटी स्पेस समाविष्ट करत आराखड्यामध्ये सुधारणा केली.

त्यामुळे २१ कोटी ९० लाख रुपयांनी खर्च वाढला. रस्ता सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या घरांचे वेध आता लागले आहेत.

नव्या वसाहतीमध्ये कार पार्किंगही

सफाई कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या जे. पी. नगर व आकुर्ली रोड या नव्या वसाहतीमध्ये कार पार्किंगसाठी जागा सोडण्यात येणार आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ३६६ ते ५४६ चौरस मीटर इतके आहे. दरम्यान संपूर्ण इमारतीचे बांधकाम ३३ हजार ३५ चौरस मीटर इतके आहे.

३०० चौरस फूटच्या ४४५ तर ६०० चौरस फुटाच्या ३६ सदनिका

या तिन्ही प्रकल्पांमध्ये ८, १८ व २३ मजली इमारती आहेत. यात सफाई कामगारांसाठी ४८१ सदनिका उपलब्ध होणार आहेत. या ३०० चौरस फुटाच्या ४४५ तर ६०० चौरस फुटाच्या ३६ सदनिका आहेत. ६०० चौरस फुटाच्या सदनिका केवळ आकुर्ली रोड येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रकल्पात झालेली खर्चाची वाढ

प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च - ९७ कोटी ८१ लाख

पहिला वाढीव खर्च - ६१ कोटी

दुसरा वाढीव खर्च - २१ कोटी

एकूण खर्च - १८० कोटी ६१ लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news