Maharashtra Water Shortage: राज्यातील चार जिल्ह्यांत ७०० टँकरने पाणीपुरवठा; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये पाण्याची टंचाई; मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची गुलाबराव पाटील यांची माहिती
Water Tanker
Water TankerPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांच्या तुलनेने छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांमध्ये जादा पाणी टंचाई आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात पाण्याची मागणी वाढली आहे.

मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांमध्ये जवळपास ७०० च्या आसपास टँकर सुरू आहेत.

Water Tanker
Pradeep Purnekar Case: पूर्णेकर हत्याप्रकरणी पोलिसांकडून राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू; उपमुख्‍यमंत्री शिंदेंनी विधान केले अन्‌ यंत्रणा हलली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक २५४ गावे आणि १,२९९ वाड्यांना २७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात १६९ टँकरद्वारे १६० गावे आणि ९३० वाड्यांना, तर अहिल्यानगर जिल्ह्यात १४६ टँकरद्वारे १४८ गावे आणि ९६७ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात १६६ टँकर सुरू आहेत.

Water Tanker
Sahil Wakode Case: साहिल वाकोडे प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; पुन्हा ‘चलो आयआयटी’ आंदोलनाची हाक

सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत. विभागीय स्तरावर आढावा घेतल्यानंतर मतदारसंघांनुसार बैठका सुरू करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news