Mumbai Water Shortage: मुंबईकरांना पाणी मिळेना, पण रस्ते धुण्यासाठी २१३ टँकर! महिन्याला ३६ कोटी लिटर पाणी खर्च होणार

धुळीकण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय; पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याने रस्ते धुण्याचे निर्देश, मात्र पुनर्प्रक्रिया पाणी मिळणार कुठून?
Mumbai Water Shortage
Mumbai Water ShortagePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईत अगोदरच पाण्याचा दुष्काळ असून तसेच मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. पाणी वापराबाबत एकीकडे नियोजन सुरु असतानाच मुंबई महापालिका हवेतील धुळीकण रोखण्यासाठी रस्ते धुणार आहे.

यासाठी सर्व उपनगरांतील ७ परिमंडळांमध्ये २१३ टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून यात २ हजार, ५ हजार व १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा समावेश आहे. त्यामुळे मासिक ३५ ते ३६ कोटी लिटर पाणी लागणार आहे.

सध्या १५ टक्के पाणीकपात मुंबईत सुरु असून त्यामुळे आतापर्यंत ३४ टक्के पाण्याची बचत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई शहरात २०२७ सालच्या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासणार आहे.

अगोदरच १० टक्के पाणी कपातीमुळे मुंबईकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ४०० दशलक्ष लिटरपेक्षा मोठी कपात झाली आहे. त्याशिवाय गळती व चोरीच्या माध्यमातून ५०० दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचे होणाऱ्या घेतली आहे. मध्यवर्ती बँकेने आपली भूमिका बदलून ‘संतुलित कठोरता’ केली आहे.

Mumbai Water Shortage
RBI Repo Rate Hike: सर्वच कर्जे महागणार! साडेतीन वर्षांनंतर रेपो दरात पाव टक्‍क्‍याची वाढ

बाष्पीकरणामुळे पाणीसाठ्यात होणारी घट यामुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनाचीही झोप उडाली आहे. त्यातच आता रस्ते धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्यामुळे मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

पावसाळा वगळता मुंबईत शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साठवून ती वातावरणात पसरते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शहरातील रस्ते पाण्याने स्वच्छ धुतले जात आहेत. यावेळीही संपूर्ण शहरातील रस्ते धुण्यासाठी १५० दिवसाकरिता भाडेतत्त्वावर टँकर घेण्यात येणार आहेत.

यात २ हजार लिटरचे ५७, ५ लिटरचे ९१ व दहा हजार लिटरचे ६५ असे २१३ टँकर कार्यरत राहणार आहेत. २१३ टँकरची एक ट्रिप झाली तरी, सरासरी १२ लाख १९ हजार लिटर पाणी लागणार आहे. म्हणजेच या २१३ टँकरने दिवसभरात दहा ट्रिप मारल्या तर, १ कोटी २१ लाख ९० हजार दशलक्ष लिटर इतके पाणी लागेल.

त्यामुळे महिन्याला सरासरी ३५ ते ३६ कोटी लिटर पाणी लागणार आहे. हे पाणी मुंबई शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्यातूनच घेतले जाण्याची शक्यता आहे. शुद्ध पाणी वापरल्यामुळे शहरात पाण्याचा मोठा तुटवडा भासून मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Water Shortage
Mumbai Airport Flights: मुंबईतील आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे स्थलांतर रोखले

स्थायी समितीत प्रस्ताव रोखणार

रस्त्यावरील धुळीकणामुळे मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते. त्यामुळे प्रदूषणमुक्त मुंबई ठेवण्यासाठी रस्ते धुणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, मुंबईच्या अनेक भागांत पाणीच येत नसल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असताना रस्ते धुलाईचा हट्ट कशासाठी, असा सवाल करत नगरसेवक नाराज झाले आहेत. प्रशासनाच्या या प्रस्तावाबद्दल स्थायी समिती सदस्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव रोखला जाण्याची शक्यता आहे.

पुनर्प्रक्रिया पाणी कुठे मिळते?

मुंबई शहरातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन, शहराला पुरवठा होणाऱ्या शुद्ध पाण्यातून रस्ते धुणे शक्य नाही. यासाठी सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून निर्माण होणाऱ्या पाण्याने रस्ते धुण्यात यावेत.

तसे निर्देश महापालिका प्रशासनाने ठेकेदारांना दिले असल्याचे समजते. मात्र, असे पुनर्प्रक्रिया केलेले पाणी कुठे मिळते याचा पत्ता अद्याप महापालिकेलाच लागलेला नाही. त्यामुळे हे पाणी ठेकेदार कुठून आणणार, असा प्रश्न आहे.

बांधकामांचे काय?

मुंबईत सध्या सुमारे २२०० इमारतींची बांधकामे सुरु आहेत. वाढत्या बांधकामांना भविष्यातही आणखी पाणी लागू शकते, असे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news