Mumbai Airport Flights: मुंबईतील आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे स्थलांतर रोखले

टर्मिनल-१ पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतराचा प्रस्ताव; सर्व एअरलाईन्ससोबत पुन्हा चर्चा करून नवा आराखडा सादर करण्याचे केंद्राचे आदेश
Airport
Airport File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ चा पुनर्विकास हाती घेतला जात असून, तेथील आंतरदेशीय म्हणजेच स्थानिक विमान उड्डाणे टर्मिनल २ वर समायोजित करण्यासाठी आठवड्याला २६५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याचा बेत केंद्र सरकारने रोखला आहे.

सर्व एअरलाईनसोबत पुन्हा सविस्तर चर्चा करून या स्थलांतराचा नवा आराखडा देण्याचे आदेश नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळाचे संचलन करणाऱ्या कंपनीला (अदानी) दिले आहेत.

याचा अर्थ आठवड्याला २६५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईत स्थलांतरित करण्यासाठी २५ ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आली होती, ती बारगळली आहे.

टर्मिनल-२ वरून आठवड्याला ७३० आंतरराष्ट्रीय विमाने उडतात. अदानी एअरपोर्ट होर्डिंगच्या स्थलांतर आराखड्यानुसार, यापैकी सर्वाधिक २२४ पैकी ७४ उड्डाणे इंडिगोची नवी मुंबईतून होणार होती.

Airport
Sachin Vaze Bail: सचिन वाझेचा जामीन रद्द करा; एनआयएची मुंबई उच्च न्यायालयात मागणी

एअर इंडियालाही ३३ उड्डाणे तर अकासा एअरला ११ उड्डाणे नवी मुंबईतून करावी लागणार होती. या स्थलांतराच्या आराखड्याचा फटका ४६ एअरलाईन्सना बसणार होता. देशांतर्गत उड्डाणांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईत हलवण्यास सर्वच एअरलाईन्सनी विरोध केल्यानंतर हे प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचले.

Airport
Chandrashekhar Bawankule: प्रशासनाला सक्ती, मंत्रिभेटीचे काय? मंत्र्यांकडून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश धाब्यावर

मंगळवारी झालेल्या बैठकीत या स्थलांतराचा नवा आराखडा २० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले होेते. मात्र, बुधवारी या संपूर्ण स्थलांतर प्रक्रियेला मंत्रालयाने ब्रेक लावला.

टर्मिनल-१ चा पुनर्विकास आवश्यक असला तरी टर्मिनल-२ वरील आंतरराष्ट्रीय विमाने अशी झटपट नवी मुंबईला हलवता येऊ शकत नाहीत. तसे केल्यास सर्वच एअरलाईन्सचा हिवाळी हंगामच धोक्यात येऊ शकतो.

हा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि मार्चला संपतो. याशिवाय नवी मुंबई विमानतळावरील अडचणींकडेही एअर लाईन्सनी लक्ष वेधल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नवी मुंबईला होऊ घातलेले स्थलांतर रोखले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news