Mumbai road safety project: रस्ता सुरक्षेसाठी पालिका ४ कोटी खर्च करणार; सूचना फलकांसह अन्य विकासकामांचा समावेश

मुंबई महापालिकेकडून सूचना फलक, दिशादर्शक फलक, दुभाजक आणि वाहतूक बेटांची कामे करण्यात येणार.
BMC
BMCpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: रस्ता सुरक्षतेसाठी मुंबई महानगरपालिकेने अपघात प्रवण क्षेत्रामध्ये विविध सूचना फलकांसह दिशादर्शक फलक, दुभाजक, वाहतूक बेट उभारणे व अन्य कामे करण्यात येणार आहेत. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून तब्बल १४ कोटी १८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई शहरात वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीसह लहान मोठे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ४७५ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या शहरातील रस्त्यांचे जाळे २ हजार कि.मी. इतके आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षिततेसाठी मुंबई पालिकेने ठोस पावले उचलली आहेत.

मुंबई शहर व उपनगरांतील अपघात प्रवण क्षेत्राची यादी, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली असून त्यामध्ये ४८ अपघात प्रवण क्षेत्र नमूद आहेत. त्यानुसार, शहर , पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे विभागांतील अपघात प्रमाण क्षेत्र येथे थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग (रंगकाम) करणे, मध्य विभाजक (डिव्हायडर) उपलब्ध करून देणे, वाहतूक बेटे बांधणे आदी सुधारात्मक कामे हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

BMC
Turbhe Accident: तुर्भे येथे वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नागरिकांनी रोखला तुर्भे स्टोअर चौकात बेलापूर ठाणे महामार्ग

मुंबईतील प्रमुख अपघातप्रवण क्षेत्र

छेडा नगर (घाटकोपर)

एससीएलआर ब्रिज (चेंबूर)

अमर महल जंक्शन (पूर्व द्रुतगती महामार्ग)

रमाबाई नगर (घाटकोपर)

BMC
Torrent Power Project: सह्याद्रीतील टोरेंट पॉवर प्रकल्पाची खरी वस्तुस्थिती काय? उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा

गोदरेज घोडा गेट सिग्नल (विक्रोळी)

आयआयटी मेन गेट (पवई)

ऐरोली टोल नाका (ऐरोली-मुलुंड रस्ता)

माहीम कॉजवे जंक्शन (माहीम फाटकजवळ)

दुर्गा नगर जंक्शन (जे.व्ही.एल.आर. रोड, जोगेश्वरी)

शिंपोली नाका (लिंक रोड, बोरीवली पश्चिम)

प्रियदर्शनी जंक्शन (सायन-चेंबूर)

किंग सर्कल जंक्शन (माटुंगा पूर्व)

अंधेरी (पूर्व) - पश्चिम द्रुतगती महामार्ग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news