Turbhe Accident: तुर्भे येथे वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नागरिकांनी रोखला तुर्भे स्टोअर चौकात बेलापूर ठाणे महामार्ग

ठाणे-बेलापूर मार्गावर रस्ता ओलांडताना ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; सुरक्षित पादचारी सुविधांची मागणी.
Turbhe Accident
Turbhe AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर चौकात सोमवारी सकाळी रस्ता ओलांडत असताना ४५ वर्षीय महिलेला कंटेनरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर येथील नागरिकांनी बेलापूर ठाणे महामार्ग काही काळ रोखून धरला होता.

तुर्भे स्टोअर हे नवी मुंबईतील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे. दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व रहिवासी या सहा पदरी महामार्गावरून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत असतात.

Turbhe Accident
Ghatkopar skywalk incident: जन्मदाता बनला चिमुकल्याचा वैरी! घाटकोपरमध्ये नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरुन खाली फेकले

रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

महापालिकेने २०१९ मध्ये तुर्भे स्टोअर येथे ५६० मीटर लांबीचा, चार पदरी उड्डाणपूल मंजूर केला होता. या पुलासाठी ४१ कोटी रुपये खर्च मंजूर असून महावीर रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते.

Turbhe Accident
Tansa Wildlife Sanctuary: तानसाच्या जंगलाला संरक्षणाचे कवच; बिबट्या, भेकरांसह २०० हून अधिक पक्षीप्रजातींचा अधिवास

परंतु हे काम चार-पाच वर्षांपासून रखडले होतेे. नंतर आयआयटी मुंबईकडून नवीन डिझाईन मंजूर करून काम सुरू करण्यात आले, प्रत्यक्षात खोदकामापलीकडे काहीही प्रगती झालेली नाही.

तुर्भे स्टोअर संघर्ष समितीच्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत या ठिकाणी २३ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news