Mumbai Roads: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ८२ टक्के रस्ते खड्डेमुक्त; उर्वरित रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार?

८.५ टक्के रस्त्यांचे काम प्रगतिपथावर; लवकरच मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर
Mumbai Roads
Mumbai RoadsPudhari
Published on: 
Updated on: 

राजेश सावंत

मुंबई: मुंबई शहर व उपनगरातील ८२.१ टक्के रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यामुळे हे रस्ते आता खड्डेमुक्त झाले आहेत, तर ८.५ टक्के रस्त्यांचे काम प्रगतिपथावर असून उर्वरित ९.४ टक्के रस्त्यांची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे खड्ड्यांमुळे त्रासदायक होणारा मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

मुंबईमध्ये ४८० किमी लांबीचे १,६०४ रस्ते असून या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटी करणाचे काम गेल्या ६ वर्षांपासून सुरू आहे. ९ मीटर रुंदीच्या प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. केवळ पावसाळ्याचे चार महिने ही कामे बंद ठेवण्यात येतात.

Mumbai Roads
Navi Mumbai Redevelopment: नवी मुंबईतील हजारो रहिवाशांना मोठा दिलासा! क्लस्टर पुनर्विकासावरील स्थगितीचा ठराव रद्द

१ ऑक्टोबरपासून पुन्हा रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून यात अर्धवट राहिलेल्या ९८ किमी लांबीच्या ३०३ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे येत्या वर्षभरात पूर्ण होतील. ही कामे पूर्ण झाल्यानंतर ६६ किमी लांबीच्या २५८ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले.

दक्षिण मुंबईतील कामे कासवगतीने

पश्चिम व पूर्व उपनगराच्या तुलनेत शहर विभागातील विशेषता दक्षिण मुंबईतील रस्त्याची कामे कासवगतीने सुरू आहेत. डोंगरी बी विभागातील ३६ रस्त्यांची कामे अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. पालिकेच्या ग्रँटरोड डी विभागात २५ व माटुंगा उत्तर विभागातही २५ रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत.

Mumbai Roads
Cristiano Ronaldo Ban: रोनाल्डोला मोठा धक्का! ३० दिवसांची बंदी आणि २५५ युरो दंड; नेमकं काय घडलं?

१ ऑक्टोबरपासून ४८ किमीच्या ९२ रस्त्यांची कामे

पावसामुळे १ जून ते ३० सप्टेंबर थांबवण्यात आलेली रस्त्याची कामे १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाली आहेत. यात ४८ किलोमीटरच्या ९२ रस्त्यांचा समावेश आहे. अर्धवट असलेल्या उर्वरित रस्त्यांची कामेही येत्या काही दिवसात सुरू होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

अंधेरी, मालाडमधील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर

शहर व उपनगरातील सर्व रस्त्यांची कामे २०२८ अखेर पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर मुंबईकरांना पूर्णपणे खड्डे मुक्त रस्त्यातून प्रवास करता येणार असल्याचा दावाही पालिकेच्या रस्ते विभागातील अभियंत्यांनी केला आहे. बोरीवली आर-मध्य विभागातील ९५ टक्के रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. अंधेरी पश्चिम, मालाड आदी भागातील रस्त्यांची कामे ही युद्धपातळीवर सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news