

Monsoon Preparation
मुंबई : मुंबई महापालिकेने मिठी नदीसह नाल्यांमधून आतापर्यंत 7 लाख 96 हजार 765 मेट्रिक टन म्हणजे 82.31 टक्के गाळ काढला आहे. त्यामुळे पावसाळा व पावसाळ्यानंतर देखील गाळ उपशाची कामे सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
गाळ काढण्याच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर केल्यामुळे साधारणतः 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची आकारणी कंत्राटदारांवर करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीसह नालेसफाईची कामे केली जातात. पावसाळा दरम्यान 10 टक्के तर उर्वरित कालावधीत 10 टक्के गाळ उपसा केला जातो. 4 जून 2025 सकाळपर्यंत 7 लाख 96 हजार 764 मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या 82.31 टक्के गाळ काढण्यात आला आहे.
गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने या कामांसाठी छायाचित्रण समवेत 30 सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य केले आहे. गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणार्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मे. टन गाळ टक्के
मोठे नाले 3,78,214 105.81
मिठी नदी 1,32,545 61.85
लहान नाले 2, 86,004 72.18