BJP Gains Control of BMC : मुंबई महापालिका तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच

गेल्या 25 वर्षांपासून असलेल्या पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपाकडेच येणार
BJP Gains Control of BMC
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपद भाजपालाच मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्या 25 वर्षांपासून असलेल्या पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या भाजपाकडेच येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

मुंबईच्या महापौरपदी भाजपाचा, तर उपमहापौरपदी शिवसेनेचा शिलेदार विराजमान होणार असला तरी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. भाजपा व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत स्थायी समिती भाजपाकडे राहावी याबाबत एकमत झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपाला आता तिजोरीतील पैसे कुठे वापरावे व कुठे वापरू नये, हे ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे.

BJP Gains Control of BMC
ZP PS Election Voting : झेडपी, पंचायत समित्यांसाठी राज्यात 66% मतदान

मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीला विशेष महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत पहिल्यांदा सादर करण्यात येतो. स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यानंतरच तो अंतिम मंजुरीसाठी सभागृहात येतो. मुंबईतील विविध विकासकामांचे प्रस्तावही स्थायी समितीच्या मंजुरीसाठी येतात. विविध धोरणात्मक निर्णय स्थायी समितीत झाल्यानंतर महापालिका सभागृहात मंजुरीसाठी येतात. त्यामुळे भाजपाने सुरुवातीपासून स्थायी समितीवर आपला दावा केला आहे.

स्थायी समिती भाजपाकडे जाणार असल्यामुळे सुधार समिती शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. किंबहुना शिवसेनेने सुधार समितीसाठी आग्रही धरला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असताना सुधार समिती भाजपाकडेच राहिली आहे. त्यामुळे यावेळीही समिती आपल्याकडे राहावी, असे भाजपाचे मत आहे. पण शिवसेना सुधार समितीसाठी आग्रही असल्यामुळे अद्याप पर्यंत याबाबतचा तिढा सुटलेला नाही.

शिक्षण व बेस्ट समिती शिवसेनेला देण्यास भाजपा तयार आहे. मात्र कमी दर्जाच्या समिती नको, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे पालिकेतील शिवसेनेची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सहकारी पक्षाला काहीतरी देता यावे, यासाठी शिवसेना निम्म्या विशेष समित्यांसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

BJP Gains Control of BMC
Ritu Tawde Mumbai Mayor : मुंंबई महापौरपदी भाजपच्या रितू तावडे

स्थायी समिती अध्यक्ष कोण?

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपामध्ये अनेक ज्येष्ठ नगरसेवक प्रयत्नशील आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक भाजपाचे माजी गटनेता प्रभाकर शिंदे यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news