Mumbai Railway Megablock: मुंबईत रेल्वे मेगाब्लॉक; पश्चिम-मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा प्रभावित

परे, मरेवर मध्यरात्री ब्लॉक; रविवारी ठाणे-वाशी-नेरूळदरम्यान लोकल सेवा 5 तास बंद
Mumbai Railway Megablock
Mumbai Railway MegablockPudhari
Published on
Updated on

मुंबई : पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाने शनिवारी मध्यरात्री अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेतला आहे, तर ट्रन्स हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक असून ठाणे ते वाशी व नेरूळदरम्यान लोकलसेवा 5 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

Mumbai Railway Megablock
Nashik Kumbh Mela: नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटींच्या कामांना मान्यता

पश्चिम रेल्वे

बोरिवली आणि भाईंदरदरम्यानच्या दोन्ही मार्गांवर जम्बोब्लॉक आणि प्रभादेवी स्थानकावरील ओव्हर ब्रिजच्या गर्डरचे डी-लाँचिंग करण्यासाठी शनिवार 14 मार्च मध्यरात्री ते रविवार 15 मार्च पहाटेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकची वेळ बोरिवली ते भाईंदरदरम्यानचा मध्यरात्री 12.15 ते पहाटे 3.45 पर्यंत, तर प्रभादेवी स्थानकावरील ब्लॉक मध्यरात्री 1.30 ते सकाळी 6 पर्यंत राहणार आहे. प्रभादेवी येथे ब्लॉकदरम्यान, काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील.

Mumbai Railway Megablock
E Rickshaw Permit: ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परमिट बंधनकारक; परिवहन विभागाचा नवा निर्णय

मध्य रेल्वे

ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 च्या विस्तारासाठी आणि डोंबिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1अ आणि 1 आणि 2 च्या विस्तारासाठी ब्लॉक असेल.

ब्लॉकचा कालावधी - शनिवार 14 मार्च मध्यरात्री 12 ते रविवार 15 मार्च सकाळी 10 पर्यंत

ब्लॉक विभाग : मुलुंड ठाणे आणि दिवा ते डोंबिवली.

Mumbai Railway Megablock
Maharashtra School Law: शाळांसाठी नवा कायदा येणार; 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, सर्व शाळांची नोंदणी अनिवार्य

ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी

लोकल पाच तास राहणार बंद

कुठे ? : ठाणे-वाशी नेरूळ ट्रान्स हार्बर अप आणि डाऊन मार्ग

कधी ? : रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत .

परिणाम : ठाणे येथून 10.35 ते 16.07 वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल तसेच पनवेल, नेरुळ, वाशी येथून 10.25 ते 16.09 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल रद्द केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news