Mumbai Local Railway Update: मुंबई-पुणे घाट विभागात भूस्खलन! लोकलसह एक्सप्रेस गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडलं... अनेक गाड्या रद्द

Mumbai Local Railway Update
Mumbai Local Railway Updatepudhari
Published on
Updated on

Mumbai Local Railway Update: हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यामुळं गाड्या रद्द कराव्या लागत आहेत किंवा त्यांच्या मार्ग बदलावे लागत आहे. काही गाड्या उशिराने धावत आहेत.

Mumbai Local Railway Update
Mega Block | शनिवारी रेल्वे प्रवाशांचे हाल! आटगाव स्थानकाजवळ मेगाब्लॉकमुळे मनमाड-मुंबई 'पंचवटी एक्स्प्रेस' रद्द

यादरम्यान, मुंबई सेंट्रलने प्रवाशांना महत्वाचा इशारा दिला असून वसई रोड ते विरार स्टेशन या दोन स्टेशनदरम्यान धावणाऱ्या लोकल या धिम्या गतीने पुढे जात आहेत. त्यामुळं प्रवाशांना गाड्या उशिरा धावणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रमाणे तुम्ही तुमच्या प्रवासाची आखणी करावी अशी विनंती देखील मुंबई सेंट्रलच्या डिव्हिडनल रेल्वे मॅनेजरच्या अधिकृत एक्स एकाऊंटवरून करण्यात आली आहे.

याचबरोबर मुंबई- पुणे घाट विभागात ठाकूरवाडी-मंकी हिल दरम्यान भूस्खलन झाल्यामुळं काही मेल एक्सप्रेस गाड्यांवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळं काही गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

Mumbai Local Railway Update
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आज दोन तास ब्लॉक; बोरघाटात वाहतूक बंद, पहा पर्यायी मार्ग

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • 11012 धर्माबाद–सीएसएमटी एक्सप्रेस (06 जुलै)

  • 11009 सीएसएमटी–पुणे एक्सप्रेस (06 जुलै)

वळविण्यात आलेल्या गाड्या

  • 11049 अहमदाबाद–कोल्हापूर

  • 22944 इंदूर–दौंड

  • 12297 अहमदाबाद–पुणे

  • 22144 बीदर–सीएसएमटी

  • 17614 नांदेड–पनवेल

  • 20915 लिंगमपल्ली–इंदूर

Mumbai Local Railway Update
Bengaluru-Mumbai Express Railway : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर: बंगळूरु-मुंबई एक्सप्रेस रेल्वेला हिरवा कंदील

शॉर्ट टर्मिनेट (मध्यंतरीच प्रवास समाप्त)

  • 20822 संबलपूर–पुणे एक्सप्रेस – पनवेल येथेच समाप्त

  • 12116 सोलापूर–सीएसएमटी सिद्धेश्वर एक्सप्रेस – पुणे येथेच समाप्त (पुढील प्रवासासाठी 11301 लिंक ट्रेन)

शॉर्ट ओरिजिनेट (मध्यंतरीतूनच सुटणार)

  • 20821 पुणे–संबलपूर एक्सप्रेस – पनवेलहून सुटणार

  • 11301 सीएसएमटी–एसबीसी उद्यान एक्सप्रेस – पुण्याहून सुटणार

Mumbai Local Railway Update
Mumbai Pune Expressway Traffic Relief: मिसिंग लिंकचा प्रभाव; मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे कोंडीमुक्त

पुनर्नियोजित (Rescheduled)

  • 18520 एलटीटी–विशाखापट्टणम एक्सप्रेस – सकाळी 9:55 वाजता सुटणार (नियोजित वेळ 6:55)

  • 11029 सीएसएमटी–कोल्हापूर एक्सप्रेस – सकाळी 11:40 वाजता सुटणार (नियोजित वेळ 8:40)

भूस्खलनामुळे घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news