Mega Block | शनिवारी रेल्वे प्रवाशांचे हाल! आटगाव स्थानकाजवळ मेगाब्लॉकमुळे मनमाड-मुंबई 'पंचवटी एक्स्प्रेस' रद्द

Mega Block | प्रामुख्याने मनमाड-धुळे इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस जाणारी व येणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
sambhajinagar railway news
Railway News : इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणामPudhari File Photo
Published on
Updated on

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वेस्थानकाजवळ इंटरलॉकिंगच्या कामासाठी मुंबई विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. ६) मुंबई-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या काही प्रमुख गाड्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. प्रामुख्याने मनमाड-धुळे इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस जाणारी व येणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

sambhajinagar railway news
Belgaum Railway: बेळगावसाठी तीन नव्या साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे

नंदिग्राम शिर्डी, देवगिरी मुंबई-बल्लारशाह एक्स्प्रेस, दादर साईनगर मुंबई-लिंगमपल्ली-एक्स्प्रेस, कुर्ला-बलिया कामायनी एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर समर एक्स्प्रेस आणि पनवेल, गोरखपूर पनवेल एक्स्प्रेस गाड्या कल्याण कर्जत लोणावळा पुणे अहिल्यानगर-कोपरगाव मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.

हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबई ऐवजी नाशिकरोडपर्यंत, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस ही गाडी मुंबई ऐवजी मनमाडपर्यंत धावणार आहे. त्याच स्थानकातून परतीचा प्रवास करतील.

sambhajinagar railway news
Konkan Railway Delay | कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! रविवारी चाकरमान्यांना तब्बल 11 तास विलंबाचा प्रचंड मनस्ताप

मुंबई हावडा मेल मुंबईहून १० तास उशिराने सुटेल. हावडा-मुंबई मेल ३.१५ तास, कुर्ला शालिमार ३.२०, कुर्ला बनारस ३.२०, कुर्ला -पाटलीपुत्र २.२५, मुंबई-गोरखपूर हॉलिडे एक्स्प्रेस ५.३०, मुंबई अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस २.३० तास मुंबई येथून उशिराने सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

मेगाब्लॉकमुळे ७ जूनला मुंबई येथून सुटणारी कुर्ला-गोरखपूर-कुशीनगर एक्स्प्रेस कुर्ला येथून १.५५ तास, मुंबई नागपूर हॉलिडे एक्स्प्रेस २ तास, मुंबई बनारस महानगरी एक्स्प्रेस २ तास विलंबाने सुटणार आहे. रेल्वेचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार आहे. मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news