Mumbai Property Tax: मालमत्ता कर थकबाकीदारांवर पालिकेचा मोठा दंडुका; 455 कोटींच्या मालमत्तांचा ई-लिलाव जाहीर

मुंबईतील हॉटेल, भूखंड, व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई; 21 दिवसांत कर न भरल्यास थेट लिलाव
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

मुंबई : मालमत्ता कर थकवल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात मोकळा भूखंड, निवासी भूखंड, व्यावसायिक गाळे, हॉटेल आदींचा समावेश आहे. तर 2 मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी 21 दिवसांची दीर्घ नोटीस देण्यात आली आली असून या नोटीसची दखल न घेतल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे.

Property Tax
Job Fraud Medha: शासकीय नोकरीचे आमिष दाखवून शेतकऱ्याची 1.80 कोटींची फसवणूक; मुंबईतील नगरसेविकेसह 11 जणांवर गुन्हा

महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने 12 फेब्रुवारिला 8 मालमत्तांवर जप्ती व अटकावणीची कार्यवाही केली. संबंधित मालमत्तांमध्ये मोकळा भूखंड, निवासी भूखंड, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे, हॉटेल आदींचा समावेश आहे. मालमत्ता करापोटी या 8 थकबाकीदाराकडे दंड रकमेसह 455 कोटी 48 लाख 94 हजार 374 रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे. वारंवार नोटीस देऊनही थकीत कर भरणा न केल्याने संबंधित 6 मालमत्तांवर जाहीर ई - लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर, 2 मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी 21 दिवसांची नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Property Tax
Mumbai Illegal Immigrants: मुंबईतील घुसखोरांविरोधात कडक कारवाईचे आदेश; कागदपत्रे तपासण्याचे निर्देश

पालिकेच्या भायखळा ई विभाग, ग्रँट रोड डी, परळ एफ दक्षिण, बांद्रा एच पश्चिम, गोरेगाव पी उत्तर, मालाड पी दक्षिण आणि दहिसर आर-उत्तर या विभागांमधील थकीत करधारकांच्या मालमत्तांवर लिलावाची नोटीस जारी करण्यात आली आहे. या आठ मालमत्तांची जाहीर ई लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

Property Tax
Mumbai Grape Price: मुंबईत द्राक्षांचे दर तेजीत; ‘शाईन मस्कत’ला सर्वाधिक मागणी

यांचा लिलाव होणार

गोरेगाव पश्चिम येथील मेसर्स आमीर पार्क ऍण्ड ऍम्युझमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे असलेले हॉटेल (मालमत्तेचे राखीव मूल्य 268 कोटी 16 लाख 9 हजार 691 रूपये), वांद्रे पश्चिम येथील भिकाभाई एन उपाध्याय व एम. जे. भट यांच्या नावे असलेली दुकाने आणि कार्यालये (मालमत्तेचे राखीव मूल्य 51 कोटी 42 लाख 9 हजार 985 रूपये), दहिसर येथील विकयलाल इन्व्हेस्टमेंट कंपनी यांच्या नावे असलेला निवासी भूखंड (मालमत्तेचे राखीव मूल्य 34 कोटी 81 लाख 19 हजार 520 रूपये),

Property Tax
Mumbai District Planning: मुंबई शहर जिल्ह्यासाठी 813 कोटींचा आराखडा मंजूर; बंदर विकास, मूलभूत सुविधा आणि महिलांसाठी मोबाईल टॉयलेटवर भर

परळ येथील मालमत्तेचे विश्वस्त लक्ष्मण रघुनाथ शेट्ये व गोपाळ पुंडलिक शेट्ये यांच्या नावे मोकळा भूखंड (मालमत्तेचे राखीव मूल्य 34 कोटी 14 लाख 30 हजार 101 रूपये), माझगाव येथील मेसर्स जयंत ऑईल मिलची तेल गिरणी, गोदाम आणि कार्यालय (मालमत्तेचे राखीव मूल्य 23 कोटी 20 लाख 97 हजार 852 रूपये) आणि मालाड - कुरार गाव येथील बच्चूभाई डासचोव आणि कंपनी मालक यांच्या नावे असेलेले व्यावसायिक वातानुकूलित शेड (मालमत्तेचे राखीव मूल्य 9 कोटी 23 लाख 4 हजार 492 रूपये) आदींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news