

Mumbai Prabhadevi station bridge closed
मुंबई : अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत रेल्वे मार्गिकेसाठी प्रभादेवी स्थानकावरील पुलाच्या पाडकामासाठी शुक्रवारी (दि.१२) रात्री १२ वाजल्यापासून हा पूल बंद करण्यात येणार आहे. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा पूल बंद केल्यावर दादर प्रभादेवी, करी रोड भागातील कोंडीत भर पडणार आहे. वरळी शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पात प्रभादेवी रेल्वे स्थानकावर डबलडेकर उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे.
सध्याच्या पुलाच्या जागी स्थानिक वाहतुकीसाठी नवा पूल उभारला जाईल. त्यावर वरळी शिवडी कनेक्टरचा पूल उभारला जाणार आहे. त्याच्या कामासाठी पाडकामाला शुक्रवारी रात्रीपासून सुरुवात केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी त्यासाठी प्रभादेवी पूल बंद करण्याचे जाहीर केले आहे.
पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी
दादर पूर्वकडून दादर पश्चिमकडे व दादर मार्केटकडे जाणारे वाहनचालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील.
परेल पूर्वकडून प्रभादेवी व लोअर परेलला जाणारे वाहनचालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (स. ७ ते दु. ३ पर्यंत).
परेल, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील
पश्चिमेकडून पूर्वकडे जाणाऱ्या वाहनांकरिता
दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील.
प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परेलला, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाणारे वाहनचालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (दु. ३ ते रात्री ११)
कोस्टल रोड व सि-लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परेल, भायखळा पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.
महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रीज) कॉ. कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) कडून शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा चालू राहील. - स. ७ ते दु. ३ पर्यंत
महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रीज) शिंगटे मास्तर चौककडून कॉ. कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) कडे वाहतूक एक दिशा चालू राहील. - दु. ३ ते रात्री ११ पर्यंत
महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज) दोन्ही वाहिन्या वाहतुकीसाठी चालू राहील. - रा. ११ ते स. ७ पर्यंत.
ना.म. जोशी मार्ग : कॉ. गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) ते धनमिल नाकापर्यंत दोन्ही वाहिन्या.
सेनापती बापट मार्ग: संत रोहिदास चौक
(एलफिन्स्टन जंक्शन) ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिन्या.
महादेव पालव मार्ग : कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौकपर्यंत दोन्ही वाहिन्या.
साने गुरुजी मार्ग: संत जगनाडे चौक ते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) पर्यंत दोन्ही वाहिन्या.
भवानी शंकर मार्ग : हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौकपर्यंत दोन्ही वाहिन्या.
रावबहादूर एस. के. बोले मार्ग : हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चर्चपर्यंत दोन्ही वाहिन्या.
संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दोन्ही वाहिन्या.
वाहतुकीस दुहेरी मार्ग चालू
सेनापती बापट मार्ग : वडाचा नाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील.