Mumbai Potholes: पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार या दाव्यात किती तथ्य आहे?

Pothole-free BMC | मुंबई महानगरपालिकेने येणाऱ्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा केला आहे.
Mumbai Potholes
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील का?(Pudhari File Photo)
Published on
Updated on

BMC Road Development

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने येणाऱ्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्षात ६९८ किमी रस्त्यांपैकी अवघ्या १८६ किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटी करण्याची कामे पूर्ण झाली आहेत. तर १५६ किमी रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून यातील काही रस्त्यांचे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहेत. २०८ किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. त्यामुळे दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणे, शक्यच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे यामुळे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने छोट्या रस्त्यांसह मोठ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यावर भर दिला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई महापालिका प्रशासनाने दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, असा दावा केला होता. पण रस्त्याची पूर्ण झालेली कामे लक्षात घेता, दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त होणे अशक्य आहे.

Mumbai Potholes
Mumbai News| दक्षिण मुंबईत कचऱ्याचे साम्राज्य!

मुंबईतील ६९८ किमी लांबीच्या रस्त्यापैकी सुमारे ५५० किमी लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या रस्त्यांची संख्या एकूण किलोमीटरच्या ५० टक्केही नाही. सध्या प्रगतीपथावर असलेली १५६ किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील निम्म्यापेक्षा जास्त रस्ते सिमेंट काँक्रीटचे झालेले असतील. पण यासाठी किमान दोन वर्षाचा कालावधी लागेल, असे सांगण्यात येत आहे.

अद्यापपर्यंत सुरु न झालेल्या २०८ किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा पुढील वर्षी काढण्यात येणार आहेत. त्यामुळे २०८ किमी लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी किमान पाच वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे किमान सहा ते सात वर्ष मुंबईकरांची रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यातून मुक्तता नसल्याचे रस्ते विभागातीलच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्यांची कामे मुदतपूर्वक पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांना विशेष सूचना केले आहेत. त्यानुसार येत्या १ ऑक्टोबरपासून दिवस-रात्र एक करून सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचेही रस्ते विभागाच्या एका वरिष्ठ अभियंताने सांगितले.

Mumbai Potholes
Mumbai News| नाहुरला उभारणार दसरी ‘राणीची बाग’

मुंबईतील रस्त्यांची संख्या - २,१२१ ( ६९८.७३ किमी)

पूर्ण झालेले रस्ते - ७७१ ( १८६ किमी)

प्रगतीपथावर असलेले रस्ते - ५७४ (१५६.७४ किमी)

काम सुरु न झालेले रस्ते - ७७६ (२०८.७० किमी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news