Mumbai Police Payroll Scam: मुंबई पोलिसांच्या पेरोल घोटाळ्यात मोठी कारवाई; 6.41 कोटींच्या गैरव्यवहाराचा मास्टरमाइंड अटकेत

Mumbai Police Payroll Scam
Mumbai Police Payroll Scampudhari
Published on
Updated on

Mumbai Police Payroll Scam: मुंबई पोलिसांच्या पेरोल घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील कथित मुख्य मास्टरमाइंडला अटक केली आहे. तत्कालीन हेड क्लर्क अजय राठोड याला दहिसर परिसरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तब्बल 6.41 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पोलिसांच्या वेतन वितरण प्रक्रियेत फेरफार करून सरकारी निधी वळवल्याचा आरोप आहे. वेगवेगळ्या नावांनी बँक खाती उघडण्यात आली आणि पोलिसांच्या खात्यातून या खात्यांमध्ये पैसे वळवण्यात आल्याचा संशय तपासात समोर आला आहे.

Mumbai Police Payroll Scam
Thane payroll scam : पॅरोल घोटाळ्याने बहुराष्ट्रीय कंपनी हादरली

हा गैरव्यवहार डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 तसेच जून ते सप्टेंबर 2020 या कालावधीत झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या वेतन वितरणातील काही विसंगती समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

तपासादरम्यान या घोटाळ्यातील 10 प्रमुख नावे समोर आली आहेत. काही व्यक्ती प्रत्यक्षात कर्मचारी नसतानाही त्यांच्या नावावर वेतन काढण्यात आल्याचा संशय आहे. माजी प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर आणि विजय चव्हाण यांचीही नावे तपासात समोर आली आहेत.

Mumbai Police Payroll Scam
Mumbai Police Salary Scam: मुंबई पोलीस दलात ‘बनावट’ पोलिसांनी उचलला पगार; समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याशिवाय क्लर्क अमोल मेघ्राम याचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात रामकिशन गणेश गोस्वामी याला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अजय राठोडच्या अटकेनंतर या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट किंवा अनधिकृत बँक खाती आणि वेतन वितरणातील गैरप्रकारांची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Mumbai Police Payroll Scam
Mumbai Police Crime Detection: मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी; ८५ टक्के गुन्हे उघडकीस, ५५९ फरार आरोपींना अटक

6.41 कोटींच्या या कथित पेरोल घोटाळ्यात आणखी कोणकोणाचा सहभाग होता आणि सरकारी निधी नेमका कुठे वळवण्यात आला, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news